23.9 C
Latur
Saturday, September 21, 2024
Homeमहाराष्ट्रमराठा आंदोलकांचा गनिमी कावा; मुंबईत दाखल होताच मंत्रालयाला घेराव घालणार

मराठा आंदोलकांचा गनिमी कावा; मुंबईत दाखल होताच मंत्रालयाला घेराव घालणार

मुंबई : पुण्यातून मराठा आंदोलक आज मुंबईत पोहोचले असून आज रात्री आझाद मैदानावर ते ठिय्या करणार आहेत. मराठा आरक्षणासाठीचा लढा सुरू असून मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा उपोषणाचे अस्त्र बाहेर काढले आहे. जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटीत गेल्या ४ दिवसांपासून त्यांचे आमरण उपोषण सुरू असून मराठा आंदोलक संतप्त झाल्याचे पाहायला मिळत आहे. एकीकडे जरांगेंचे आंदोलन सुरू असताना दुसरीकडे वडगोद्री येते लक्ष्मण हाके यांनीही उपोषण सुरू केले आहे. त्यामुळे, जालना जिल्ह्यात मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे.

पुण्यातून निघालेले मराठा आंदोलक आता मुंबईत दाखल झाले असून या आदोलकांच्या अवतीभोवती चेंबूर पोलिसांचा मोठा फौजफाटा दिसून येत आहे. पुण्यातील मराठा आंदोलकांनी मंत्रालयाला घेराव घालण्याचा इशारा दिला होता. त्यासाठी आज ते आरक्षणाची मागणी मान्य करावी, असे म्हणत मुंबईत दाखल झाले आहेत. मराठा आरक्षण मुख्यमंत्री स्मरण यात्रा असे या आंदोलनाला नाव देण्यात आले आहे. रात्री ९ वाजता चेंबूरमधील शिवरायांच्या पुतळ्यासमोर आंदोलकांनी घोषणाबाजी करत राज्य सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. यावेळी, मनोज जरांगे यांच्यासह मराठाआरक्षणासाठी त्यांनी घोषणाबाजी केली.

सकल मराठा समाज पुण्याच्या वतीने स्मरण यात्रा काढून मंत्रालयाला घेराव घालण्यासाठी आणि मुख्यमंर्त्यांची भेट घेण्यासाठी पुण्यातील कार्यकर्ते मंत्रालयाकडे निघाले आहेत. मनोज जरंगे गेल्या चार दिवसांपासून उपोषण करत असताना सरकार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप या कार्यकर्त्यांनी केला. आज सकाळी हे कार्यकर्ते पुण्यातल्या खंडोबा चौकातून मंत्रालयाच्या दिशेने मार्गस्थ झाले आहेत. मराठा आक्षणासाची मागणी सरकारने पूर्ण करावी आणि मनोज जरांगेंच्या मागण्याकडे गांभीर्याने पाहावे आणि मुख्यमंत्र्यांनी दिलेले आश्वासन याबाबत स्मरण करून देण्यास ही यात्रा काढण्यात आली आहे. ही यात्रा मुंबईच्या प्रवेशद्वार चेंबूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात दाखल झाली असून इथे मोठा पोलिस बंदोबस्तात ही यात्रा पुढे निघाली आहे. मुख्यमंत्र्यांनी आमची तत्काळ भेट घ्यावी, अशी मागणी या मराठ्यांची आहे.

जालन्यात मराठा-ओबीसी संघर्ष
जालना जिल्ह्यातील वडिगोद्री येथे ओबीसी आंदोलकांनी रस्ता रोको केला. त्यामुळे पुन्हा एकदा तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. आंदोलकांकडून रास्ता रोको केला जात आहे. पोलिस आंदोलकांची समजूत घालण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, संतप्त आंदोलकांकडून पोलिसांशी हुज्जत देखील घातली जात आहे. कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी काल रात्रीपासूनच अंतरवाली सराटीजवळ चोख बंदोबस्त ठेवला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR