लातूर : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना लातूरमध्ये काळे झेंडे दाखवल्याचा प्रकार समोर आला आहे. बावनकुळे आज लातूरच्या दौ-यावर आहेत, यादरम्यान मराठा आंदोलकांनी हे काळे झेंडे दाखवले आहेत. मराठा समाजाला आरक्षण द्यावं या मागणीसाठी मराठा समाजाकडून आंदोलन केलं जात असून आज लातूरात मराठा आंदोलक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळालं.