25.5 C
Latur
Wednesday, February 5, 2025
Homeसोलापूरमराठा सेवा संघ झेडपी शाखेतर्फे कर्तृत्ववान महिलांचा सन्मान

मराठा सेवा संघ झेडपी शाखेतर्फे कर्तृत्ववान महिलांचा सन्मान

सोलापूर – राजमाता जिजाऊ यांच्यामुळेच छत्रपती शिवाजी महाराज घडले, स्वराज्य निर्मितीत त्यांचे मोठे योगदान आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी केले. जिल्हा परिषद मराठा सेवा संघ शाखेतर्फे राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा परिषदेच्या सभागृहामध्ये आयोजित कर्तृत्ववान महिलांच्या सन्मानप्रसंगी त्या बोलत होत्या.

याप्रसंगी उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील, मुख्य लेखा व वित्त अधिकारी मीनाक्षी वाकडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ईशाधीन शेळकंदे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रसाद
मिरकले, कार्यकारी अभियंता सुनील कुलकर्णी, नरेंद्र खराडे, संतोष गाडेकर, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी नवनाथ नरळे, कृषी विकास अधिकारी परमेश्वर वाघमोडे, माध्यमिकच्या प्रभारी शिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे, मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष तात्यासाहेब पाटील, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव आदी उपस्थित होते.

प्रारंभी जिल्हा परिषद मराठा सेवा संघ शाखेचे अध्यक्ष अविनाश गोडसे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या स्मिता पाटील, मीनाक्षी वाकडे, तृप्ती अंधारे, डॉ. अनिता बांगर, दीपाली शेंडे, रेणुका वठारे, प्रज्ञा कुलकर्णी, नम्रता मिठ्ठा, मयूरी जावळकोटी, वसुंधरा जिंदे, सुरेखा सरवळे, ओमदेवी घंटे, छाया क्षीरसागर यांचा सीईओ आव्हाळे यांच्या हस्ते गौरव करणयात आला.

सूत्रसंचालन सरस्वती पवार यांनी केले. ख्यातमान गीतकार मोहम्मद अय्याज यांच्या राज्यगीताने कार्यक्रमाचा समारोप झाला. कार्यक्रमास अरुण क्षीरसागर, वाय. पी. कांबळे, नीलेश देशमुख, काशीनाथ बिराजदार, तजमूल मुतवल्ली, राजेश देशपांडे, विवेक लिंगराज, लक्ष्मण वंजारी, शिवाजीराव गवळी, रामचंद्र शिंदे, अनिरुध्द पवार आदी उपस्थित होते. यानिमित्ताने आयोजित रक्तदान शिबिराला चांगला प्रतिसाद मिळाला.

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR