29.5 C
Latur
Friday, February 21, 2025
Homeधाराशिव‘खाज’ काय असते मराठा समाज मतदानातून दाखविणार

‘खाज’ काय असते मराठा समाज मतदानातून दाखविणार

सावंत यांचे वक्तव्य समाज विसरला नाही

मच्छिंद्र कदम
धाराशिव : वाचाळवीर तानाजी सावंत या ना त्या वक्तव्याने सतत चर्चेत असतात त्यातच त्यांनी मराठ्याबद्दल केलेल्या वक्तव्याची सध्या परंडा विधानसभा मतदारसंघात सर्वत्र जोरदार चर्चा सुरू झाली आहे ती म्हणजे तानाजी सावंत यांनी ‘महायुतीचे सरकार आले की मराठ्यांना आरक्षणाची खाज सुटते’ असे बेताल वक्तव्य केले होते.

हेच त्यांचे बेताल वक्तव्य विधानसभा निवडणुकीत त्यांच्या अंगलट येणार आहे. सध्या या वक्तव्याची मतदारसंघात मराठा समाजाकडून मोठी चर्चा सुरू झाली आहे. शिवाय सोशल मीडियावरही अनेक ठिकाणी हे वाक्य व्हायरल झाले आहे. त्यामुळे सावंतांच्या हे वक्तव्य चांगले चांगले येणार आहे असे दिसून येत आहे.

भूम परंडा वाशी विधानसभा निवडणुकीचा प्रचार सर्वत्र तापला आहे .त्यामध्ये वाचाळवीर सावंत यांनी आजपर्यंत केलेली वक्तव्य सध्या या निवडणूक प्रचारात कळीचा मुद्दा ठरत आहेत. विरोधकाकडून हे त्यांची वक्तव्य सोशल मीडियामध्ये व्हायरल केली जात आहे.

त्यात महाराष्ट्र मी भिकारी करेन…., पक्ष फोडण्यासाठी आपण अनेक बैठका घेतल्या….., राष्ट्रवादीच्या बैठकीला बसणे म्हणजे मला उलट्या आल्यासारखे वाटते परंतु नाईलाजाने बसावे लागते,….. तसेच मराठा समाजाबद्दल केलेले महायुतीचे सरकार आल्यावरच मराठ्यांना खाज सुटते…. असे अनेक कितीतरी वाचाळवीरांनी वक्तव्य केली आहेत मराठ्यांना महायुतीचे सरकार आल्यावरच खाज सुटते हेच त्यांचे वक्तव्य आज त्यांच्या अंगलट येत आहे.

निवडणुकीत मराठा युवकांकडून मराठा समाजाबद्दल केलेल्या वक्तव्याचा सोशल मीडियावर त्यांचा चांगला समाचार घेतला जात आहे . या निवडणुकीत सावंत यांना हिसका दाखवू अशी चर्चा रंगू लागली आहे. तानाजी सावंत यांच्यावर मुळात धनगर समाज नाराज आहे त्यातच मुस्लिम समाज तर महायुतीच्या पाठीशी राहणे शक्यच नाही .त्यातच आता ज्या समाजात त्यांचे अस्तित्व होते अशा मराठा समाजाबद्दल त्यांनी केलेले बेताल वक्तव्य यामुळे हा समाज देखील त्यांच्यापासून दूर गेला आहे .

यामुळे त्यांना मते मिळणार का असा प्रश्न निर्माण झाला आहे त्यातच लाखोंच्या मताने आपला विजय होणार असे ते सांगत सुटले आहेत हे त्यांचे गर्वहरण २० नोव्हेंबरला मतदाना दिवशी मतरूपातून मतदार करून दाखवणार आहेत येत्या २३ नोव्हेंबरला हे दिसून येईल त्यामुळे या मतदारसंघातील जनता आता केवळ निकालाची वाट पाहत आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR