27.1 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeउद्योगलक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर तेजीसह बाजार बंद

लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर तेजीसह बाजार बंद

मुंबई : शेअर बाजारात आज म्हणजेच १ नोव्हेंबर २०२४ रोजी लक्ष्मीपूजनानिमित्त एका तासासाठी ट्रेडिंग सुरू होते. मुहूर्त ट्रेडिंग म्हणून ओळखला जाणारा हा १ तासाचा ट्रेडिंग दरवर्षी दिवाळी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी एका विशेष सत्रांतर्गत आयोजित केला जातो.

गेल्या दिवाळीपासून यंदाच्या दिवाळीपर्यंत बाजाराने गुंतवणूकदारांना उत्तम परतावा दिला आहे. अशा परिस्थितीत यापुढेही चांगला परतावा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. आज मुहूर्त ट्रेडिंग दरम्यान, शेअर बाजारात जोरदार तेजी दिसून आली. मुहूर्त ट्रेडिंगनंतर शेअर बाजार तेजीसह बंद झाला.

एक तासाच्या मुहूर्त ट्रेडिंगच्या अखेरिस शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ३३५ अंकांनी वधारून ७९,७२४.१२ वर, तर निफ्टी ५० हा ९४ अंकांनी वधारून २४,२९९.५५ वर बंद झाला. बीएसईच्या टॉप ३० पैकी २६ शेअर्समध्ये तेजी होती. तर ४ शेअर्समध्ये घसरण झाली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR