22.3 C
Latur
Sunday, September 8, 2024
Homeमहाराष्ट्रगुलाबांच्या फुलांनी सजली बाजारपेठ

गुलाबांच्या फुलांनी सजली बाजारपेठ

शेतक-यांसह फुल विक्रेत्यांचे व्यावसायही बहरले

जळगाव : फेब्रुवारी महिना हा प्रेमाचा महिना समजला जातो. सध्या ‘व्हॅलेंटाईन वीक’ सुरू आहे. प्रेमी युगूल आपले प्रेम व्यक्त करण्यासाठी हा खास आठवडा साजरा करतात. ‘व्हॅलेंटाईन डे’ला या आठवड्याची सांगता होते. एकमेकांवर प्रेम करणारे आपल्या जोडीदाराला भेटवस्तू देतात. प्रेम आणि शुभेच्छा देण्यासाठी गुलाबाच्या फुलांचा मोठ्या प्रमाणात वापर होतो.

गुलाबाची फुले भेट देण्यासाठी तसेच सजावटीसाठी मोठ्या प्रमाणात वापरली जातात. याच कारणामुळे या आठवड्यात गुलाबांच्या फुलाला मोठी मागणी असते. अवघ्या दोन दिवसांवर व्हॅलेंटाईन डे येऊन ठेपला असून ‘व्हॅलेंटाईन डेट’च्या पार्श्वभूमीवर बाजारात गुलाबाच्या फुलांना चांगलीच मागणी असल्याचे पाहायला मिळत आहे.

फुलांना मिळतोय समाधानकारक भाव
दररोज १ हजार ते २ हजार शेकड्याने गुलाबाची विक्री होते मात्र ‘व्हॅलेंटाईन डे’ च्या पार्श्वभूमीवर पाच ते सहा हजार शेकडा याप्रमाणे गुलाबाच्या फुलांची विक्री होत आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या तसेच रंगाच्या फुलांना मोठी मागणी आहे गुलाबाच्या फुलांना समाधानकारक भाव मिळत असल्याने गुलाबाच्या फुलांची शेती करणा-या शेतक-यांमध्येसुद्धा आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR