27.6 C
Latur
Monday, May 27, 2024
Homeअंतरराष्ट्रीयब्रिटनमध्ये पृथ्वीवरच बनविला मंगळ ग्रह

ब्रिटनमध्ये पृथ्वीवरच बनविला मंगळ ग्रह

लंडन : वृत्तसंस्था
अंतराळात अनेक रहस्य दडलेली आहेत, असे म्हटले जाते. म्हणूनच जगभरातील जवळजवळ सर्वच देश अंतराळ संशोधन करताना दिसत आहेत. अनेक देशांनी विविध ग्रहांवर अंतराळ मोहिमा केल्या आहेत तर काही देश भविष्यातील अंतराळ मोहिमांची तयारी करत आहेत. आता ब्रिटनमधील शास्त्रज्ञांनी पृथ्वीवरच मंगळ ग्रह तयार केला आहे.

ब्रिटन देशही अंतराळ संशोधनात मागे नाहीय. ब्रिटनकडून आगामी मंगळ मोहिमेसाठी जोरदार तयारी सुरू आहे. त्यासाठी ब्रिटनने पृथ्वीवरच मंगळ ग्रह बनवला आहे. ब्रिटनमधील शास्त्रज्ञांनी एका शहरात मंगळ ग्रहाप्रमाणे वातावरण तयार केले आहे. ब्रिटनच्या आगामी महत्त्वाकांक्षी मंगळ मोहिमेसाठी हे महत्त्वाचे पाऊल आहे. २०२८ मध्ये ब्रिटनची मंगळ मोहीम पार पडणार आहे. त्यासाठी ब्रिटनच्या शास्त्रज्ञांनी पृथ्वीवरच मंगळ ग्रहासारखे वातावरण तयार केले आहे.

ब्रिटन मंगळ ग्रहावर जाण्याची मोहीम आखत आहे. या पार्श्वभूमीवर ब्रिटनचे शास्त्रज्ञ स्टीवनेज यांनी मंगळ ग्रह निर्माण केला आहे. ब्रिटनने एका शहराला मंगळ ग्रह बनवले आहे. या शहरातील शेकडो एकर जमिनीवर मंगळ ग्रहासारखे वातावरण निर्माण करण्यात आले आहे. या कृत्रिम मंगळ ग्रहावर शास्त्रज्ञांचे पथक संशोधन करत आहे. याला कृत्रिम मंगळ ग्रह, असेही म्हणता येईल.

ब्रिटनची अंतराळ संस्था मंगळ मोहीम आखत आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी एका शहराचेच रुपांतर मंगळ ग्रहात केले आहे. तेथील लाल माती आणि इतर परिस्थिती प्रमाणे वातावरण तयार करण्याचा प्रयत्न शास्त्रज्ञांनी केला आहे. शास्त्रज्ञांनी रोव्हर तयार केला असून त्याचीही चाचणी या कृत्रिम मंगळ ग्रहावर त्याची चाचणी करण्यात येणार आहे.

ब्रिटनने हर्टफोर्डशायर शहरात बनवले मंगळ
फ्रेंच दिग्गज एरोस्पेस एअरबसने आपल्या एक्सोमार्स रोव्हरची चाचणी घेण्यासाठी हर्टफोर्डशायर शहरातील औद्योगिक वसाहतीत २२.५ दशलक्ष किमी अंतरावरील मंगळ ग्रहाच्या पृष्ठभागाप्रमाणे परिस्थिती तयार करण्यासाठी लाल वाळू आणि खडकांचा वापर केला आहे. मंगळ ग्रहाचे हुबेहुब प्रतिकृती तयार केल्याने शहरात हे आकर्षणाचे ठिकाण ठरले आहे.

ब्रिटनचे मंगळयान २०२८ ला झेपावणार
ब्रिटनचे मंगळयान २०२८ मध्ये जाणार आहे. या मोहिमेचा मूळ उद्देश मंगळ ग्रहावरील पाणी आणि जीवनाचे अस्तित्व शोधणे, हा असेल. एअरबसचे शास्त्रज्ञ स्टीवनेजमध्ये रोव्हर बनवले आहे. यामुळे यू्के स्पेस क्षेत्रात ३५०० लोकांना रोजगारही मिळाला आहे. कंपनी लवकरच युरोपियन स्पेस एजन्सीसोबत यासंबंधित करार करणार आहे, असे सूत्रांचे म्हणणे आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR