39.2 C
Latur
Tuesday, May 28, 2024
Homeमहाराष्ट्रउज्वल निकम यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा नोंदवा

उज्वल निकम यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा नोंदवा

कोल्हापूर : प्रतिनिधी
मुंबईवर २६/११ ला दहशतवादी हल्ला होणार अशी माहिती अमेरिकेच्या गुप्तचर संघटनांनी आयबी खात्याला दिली होती. मुंबईतील दोन हॉटेलवर हल्ला करण्यासाठी बोट निघाली असून त्याचे अक्षांश आणि रेखांश असे आहेत इतकी माहिती अमेरिकन एजन्सीकडून मिळाली होती. ही माहिती मुंबई पोलिस, महाराष्ट्र शासन यांना देण्याची जबाबदारी गुप्तचर संघटनेचे तत्कालीन अधिकारी प्रभाकर अलोक यांची होती. मात्र, खटला सुरू झाल्यानंतर आरएसएस आणि उज्वल निकम या दोघांनी मिळून त्यावेळी शासन आणि कोर्टाची दिशाभूल केल्याचा आरोप हु किल्ड करकरे पुस्तकाचे लेखक माजी पोलिस अधिकारी शमशुद्दीन मुश्रीफ यांनी केला.

उज्वल निकम हे या सगळ््या बाबींसाठी संपूर्णपणे जबाबदार आहेत. त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशी मागणीही मुश्रीफ यांनी केली. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी निकम यांच्यावर केलेले आरोप खरे असल्याचे त्यांनी म्हटले. दरम्यान, शहीद हेमंत करकरे यांच्याबद्दल केलेले विजय वडेट्टीवारांचे विधान हे त्यांचे व्यक्तिगत असून त्यांना कोणती शासकीय माहिती असेल. मात्र, हे काँग्रेसचे मत नाही, अशी प्रतिक्रिया काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR