21.2 C
Latur
Sunday, February 23, 2025
Homeराष्ट्रीयरामनगरिया जत्रेत भीषण आग ; १०० झोपड्या जळाल्या, एक ठार

रामनगरिया जत्रेत भीषण आग ; १०० झोपड्या जळाल्या, एक ठार

फारुखाबाद : उत्तर प्रदेशच्या फारुखाबाद येथे सुरू असलेल्या रामनगरिया जत्रेत भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. या आगीत एका मुलाचा मृत्यू झाला. तर सहाहून अधिक जणांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आग कशी लागली हे अद्याप समजू शकलेले नाही. पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

रामनगरिया जत्रेला लागलेल्या आगीत यात्रेकरूंच्या सुमारे १०० झोपड्या जळून खाक झाल्या. तसेच एका मुलाचा मृत्यू झाला असून सात जणांची प्रकृती चिंताजनक आहे. तीन जणांना हायर सेंटर सैफई येथे रेफर करण्यात आले आहे. इतरांना लोहिया रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

आगीनंतर झोपडीत ठेवलेल्या सिलिंडरचाही ब्लास्ट झाला आहे. या आगीत एका १४ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच प्रशासकीय कर्मचा-यांसह अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले असून अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवता आले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR