नवी दिल्ली : देशात आजपासून ३८४ हून अधिक औषधे महाग झाली आहेत. औषधांचे दर सुमारे १२ टक्क्यांनी वाढले आहेत. अशा परिस्थितीत आता लोकांना अँटीबायोटिक्सपासून ते पेनकिलरपर्यंत औषधांसाठी अधिक पैसे खर्च करावे लागतील.
कॅन्सर, हृदयविकार, अॅनिमिया, मलेरिया, अँटी सेप्टिक यासह अनेक औषधे आजपासून नवीन दरात उपलब्ध होणार आहेत. वार्षिक घाऊक किंमत निर्देशांका नुसार औषधांचे दर वाढवण्याची परवानगी सरकारने फार्मास्युटिकल कंपन्यांना दिली आहे. नियमानुसार औषध कंपन्या वर्षभरात केवळ १० टक्के दर वाढवू शकतात. मात्र यावेळी २ टक्के अधिक म्हणजेच १२ टक्के अधिक दर वाढवण्यात आले आहेत. गेल्या काही वर्षांत फार्मा सेक्टरशी संबंधित उत्पादने १५ ते १०० टक्क्यांनी महाग झाली आहेत.
आजपासून ही औषधे महाग झाली
महाग झालेल्या औषधांमध्ये व्हिटॅमिन गोळ््या, स्टिरॉइड्स, पेन किलर, टीबी, कॅन्सर, मलेरिया, एचआयव्ही एड्स, अँटी-बायोटिक्स, अँटी-डोट्स, अॅनिमिया, डिमेंशिया औषधे, बुरशीविरोधी औषधे, हृदयविकाराची औषधे, त्वचा रोग संबंधित औषधे, प्लाझ्मा, जंतुनाशक औषधे यांचा समावेश आहे.