करमाळा (प्रतिनिधी)
करमाळा तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या मालकीचा आदिनाथ कारखाना अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत अडचणीच्या काळात सुरू केला आहे. हा कारखाना वाचवण्यासाठी करमाळा तालुक्यातील प्रत्येक ऊस उत्पादक सभासदांनी आदिनाथला ऊस घालावा असे प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब बेंद्रे यांनी केले आहे.
ऊस उत्पादक शेतकऱ्यांना २७०० रुपये प्रमाणे ऊस दर देण्यात येणार असून तर उरलेल्या नफ्यातून पुन्हा शेतकऱ्यांना पैसे देण्यासाठी मी कटिबद्ध आहे असे आश्वासन बाळासाहेब बेंद्रे यांनी दिले.
आदिनाथ कारखान्याच्या कर्मचाऱ्यांनी अत्यंत कमी खर्चात म्हणजे केवळ सव्वा कोटी रुपयात कारखाना दुरुस्त करून कारखाना सुरू केला आहे.आठ इंची दोन पाईपलाईन सुरू केले आहेत. 2018/2019 वर्षीचे ऊस उत्पादकांचे ऊस वाहतूकदारांचे सर्व पेमेंट अदा केले आहे.
ऊस उत्पादकांचे राहिलेले दोन कोटी ५३ लाख रुपये अदा केले आहेत.मागील संचालक मंडळांनी या रकमा थकवल्या होत्या.कारखाना विस्तारीकरणाचा सव्वाशे कोटी रुपयांचा कर्ज प्रकरणाचा प्रस्ताव शासन दरबारी दाखल केला आहे.अडचणीत व पारदर्शक कारभार करीत कारखाना पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहे. यासाठी सर्व ऊस उत्पादक सभासदांनी आदिनाथ कारखाना करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या मालकीचाच राहिला पाहिजे हा उद्देश डोळ्यापुढे ठेवून आदिनाथ कारखान्याला ऊस द्यावा.प्रशासकीय मंडळ सदस्य महेश चिवटे संजय गुटाळ अत्यंत परिश्रम घेऊन काम करत आहेत.आदिनाथ कारखाना वाचवणे ऊस उत्पादक सभासद शेतकऱ्यांच्या हातात आहे असे बोंद्रे म्हणाले.