30.2 C
Latur
Saturday, July 6, 2024
Homeराष्ट्रीयआदर्श गैरव्यवहाराचा राज्यसभेत उल्लेख; काँग्रेस नेत्याचा उलटवार

आदर्श गैरव्यवहाराचा राज्यसभेत उल्लेख; काँग्रेस नेत्याचा उलटवार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
भाजपचे नेते व खासदार अशोक चव्हाण यांच्याशी संबंधित मुंबईतील आदर्श गैरव्यवहाराचा उल्लेख आज पुन्हा राज्यसभेत झाला. खासदार अशोक चव्हाण यांचे भाषण संपल्यानंतर काँग्रेसचे खासदार प्रमोद तिवारी यांनी अशोक चव्हाण यांचा ‘भाजपचे आदर्श नेते’ असा उल्लेख करीत ते भाजपच्या ‘वॉश्ािंग मशीन’मधून बाहेर पडल्याची टिप्पणी केली.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या संसदेतील अभिभाषणावर मांडण्यात आलेल्या धन्यवाद प्रस्तावावरील चर्चेत भाजपचे खासदार अशोक चव्हाण यांनी भाग घेतला. यावेळी त्यांनी मोदी सरकारने गेल्या दहा वर्षांमध्ये केलेल्या कामाचा आढावा घेतला. मात्र यावेळी ‘आप’चे खासदार संजय स्ािंह यांनी अशोक चव्हाण यांच्या नांदेडमध्ये भाजपचा पराभव झाला आहे, असे सांगितले.

यावर उत्तर देताना खासदार चव्हाण यांनी २०१४ मध्ये महाराष्ट्रात काँग्रेसचे केवळ दोन खासदार निवडून आले होते. त्यात नांदेडच्या जागेचा समावेश होता, असा उल्लेख केला. या विजयात माझा काहीसा वाटा होता, असेही त्यांनी सांगितले. अशोक चव्हाण यांच्या भाषणानंतर काँग्रेसचे उपनेते प्रमोद तिवारी यांनी भाषण केले. यावेळी त्यांनी आदर्श गैरव्यवहारात सामील असलेले अशोक चव्हाण भाजपच्या वॉशिंग मशीनमधून स्वच्छपणे बाहेर पडले, असा उल्लेख केला. चव्हाण आता भाजपसाठी आदर्श नेते आहेत, असा टोमणाही त्यांनी मारला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR