25.7 C
Latur
Monday, February 24, 2025
Homeमहाराष्ट्रमर्सिडीजप्रकरण नीलम गो-हेंना भोवले

मर्सिडीजप्रकरण नीलम गो-हेंना भोवले

सुषमा अंधारेंकडून अब्रूनुकसानीचा दावा

मुंबई : एखादे पद मिळविण्यासाठी दोन मर्सिडीज गाड्या द्याव्या लागत होत्या, असा दावा शिंदे गटाच्या नेत्या नीलत गो-हे यांनी केला. त्यावरून आता ठाकरे गट विरुद्ध शिंदे गट असा सामना रंगला आहे. नीलम गो-हे यांच्यावर सोशल मीडियाच्या माध्यमातून कडाडून हल्ला करणा-या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे आता नीलम गो-हे यांच्याविरोधात अब्रूनुकसानीचा दावा दाखल करणार आहेत.

दरम्यान, शिवसेनेत फूट पडल्यानंतर साधारणपणे वर्षभराने विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करणा-या डॉ. नीलम गो-हे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर खळबळजनक आरोप केला आहे.

राजधानी दिल्लीमध्ये अलीकडेच ९८वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले होते. त्यामध्ये ठाकरे यांच्या शिवसेनेत दोन मर्सिडीज गाड्या दिल्या की, एक पद मिळायचे. शिवसेनेच्या प्रत्येक कार्यक्रमासाठी ठाण्यातून माणसे आणली जायची. गल्ला गोळा करण्याचे काम एकनाथ शिंदे यांना देण्यात आले होते, असा दावा त्यांनी केला होता.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR