एआय हब बांधण्यासाठी मायक्रोसॉफ्ट १७.५ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार

नवी दिल्ली : जगात सध्या एआयची चर्चा आहे. संपूर्ण जगाचे भविष्य हे एआयच्या हातात आहे. त्यामुळे सर्वच देशांमध्ये एआय हब तयार करण्यासाठी स्पर्धा सुरु झाली आहे. अशातच आता मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे. या भेटीत मायक्रोसॉफ्टने भारतात १७.५ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करण्याचे आश्वासन दिले आहे. ही कंपनीची आतापर्यंतची आशियातील सर्वात मोठी गुंतवणूक असणार आहे. याद्वारे एआय हब उभारले जाणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला यांनी, भारतात एआय विकासासाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधा आणि कौशल्ये तयार करण्यासाठी १७.५ अब्ज अमेरिकन डॉलर्सची गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे. ही मायक्रोसॉफ्टची आशियातील आतापर्यंतची सर्वात मोठी गुंतवणूक असणार आहे. यामुळे भारताला प्रथम एआय बनण्यास मदत होईल असं नडेला यांनी म्हटले आहे. दरम्यान, सत्या नडेला सध्या मायक्रोसॉफ्टचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. स्टीव्ह बाल्मर यांच्यानंतर २०१४ मध्ये त्यांनी सीईओ पद स्वीकारले होते. त्यानंतर जॉन डब्ल्यू. थॉम्पसन यांच्यानंतर ते २०२१ मध्ये मायक्रोसॉफ्टचे अध्यक्ष बनले. यापूर्वी ते मायक्रोसॉफ्टच्या क्लाउड आणि एंटरप्राइझ ग्रुपचे कार्यकारी उपाध्यक्ष होते.

जग भारताबद्दल आशावादी : मोदी
सत्या नडेला यांच्या या घोषणेनंतर पंतप्रधान मोदी म्हणाले की एआयच्या बाबतीत जग भारताबद्दल आशावादी आहे. माझी सत्या नडेला यांच्याशी महत्त्वाची चर्चा झाली. मला आनंद आहे की भारत असा देश बनत आहे जिथे मायक्रोसॉफ्ट आशियातील आतापर्यंतची सर्वात मोठी गुंतवणूक करणार आहे. भारतातील तरुण नवीन कल्पनांद्वारे जगात क्रांती करण्यासाठी एआयच्या शक्तीचा वापर करण्यासाठी मिळणा-या या संधीचा फायदा घेतील.

मोदी आणि नडेला यांची दुस-यांदा भेट
पंतप्रधान मोदी यांनी नडेला यांच्यातील यंदाची ही दुसरी भेट आहे. या वर्षाच्या सुरुवातीलाही या दोघांची भेट झाली होती. पंतप्रधानांच्या भेटीनंतर नडेला यांनी सोशल मीडियावर पोस् करताना म्हटले की, आम्हाला एआय क्षेत्रात भारतासोबत काम करायचे आहे. भारताला एआय-फस्ट बनवण्यासाठी आणि विविध क्षेत्रात एकत्र काम करण्यासाठी मी मी उत्सुक आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
वर्धापन दिन । पुरोगामी विचाराचे एकमत
00:00
Video thumbnail
LATUR|एकमतच्या 35 व्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने सत्त्कारमूर्तींच्या प्रतिक्रिया
21:01
Video thumbnail
Nanded|शेतात मोठा खड्डा अन् आत देवीची मूर्ती! नायगावमध्ये नेमकं गूढ काय?
00:52
Video thumbnail
Latur|लातूर RTO मध्ये एजंटची दादागिरी? थेट इन्स्पेक्टरला लाथाबुक्क्यांनी मारहाण!
03:18
Video thumbnail
Latur|शेतकऱ्यांच्या मुलीच्या लग्नासाठी ‘शुभमंगल’ योजना आणण्याचा प्रयत्न - धिरज देशमुख
08:10
Video thumbnail
CHAKUR|महिला सक्षमीकरणात विशेष योगदान-ज्योतीताई स्वामी
04:32
Video thumbnail
RENAPUR|ग्रामीण प्रशासनातील आदर्श अधिकारी तानाजी यादव
04:43
Video thumbnail
UDGIR|साहित्य शिक्षण ,सांस्कृतिक क्षेत्रात अनिता येलमटे यांचे योगदान
03:05
Video thumbnail
UDGIR|दुष्काळाच्या मातीत शिक्षणाची गंगा प्राचार्य सूर्यकांत चवळे
04:08
Video thumbnail
UDGIR|सेवाभाव,संवेदनशीलता समर्पणाचा आदर्श-डॉ प्रियांका राठोड
02:49
Video thumbnail
UDGIR|गावच्या मातीचा सुगंध बाल भारतीच्या पाठयपुस्तकात रसूल पठाण यांचा प्रेरणादायी प्रवास
04:01
Video thumbnail
RENAPUR|महेबूब शेख यांची बांधकाम क्षेत्रात यशोगाथा
02:24
Video thumbnail
DEVANI|आधुनिक शेतीचा चमत्कार महेश रबशेट्टे
04:35
Video thumbnail
UDGIR|समाजसेवा,शिक्षण आणि सांस्कृतिक दीप प्रज्वलित ठेवणाऱ्या प्रा.ज्योती कवडेकर
02:35
Video thumbnail
DEVANI|दुष्काळाच्या मातीतून उद्योगाची भरारी;शेतकरी समृद्धीचा अध्याय-बिभीषण भोसले
03:41

Latest news