16.2 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeनांदेडउत्तर नांदेड सह जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के

उत्तर नांदेड सह जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के

नांदेड : उत्तर नांदेड सह जिल्ह्यात गुरुवारी सकाळी ६.९ वाजता भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला, रिशटर स्केलमध्ये उत्तर नांदेड परिसरात 4.2 अशी नोंद झाल्याचे समजते.

जिल्ह्यात अनेक भागात भूकंपाचा धक्का जाणवल्यामुळे नागरिक घराबाहेर निघाले. ग्रामीण भागात तीन पत्राच्या घरात हा धक्का मोठ्या प्रमाणात जाणवला .तर शहरातही अनेक ठिकाणी भूकंपाच्या धक्क्याने नागरिक भयभीत झाले होते. नांदेड शहरात यापूर्वी देखील अनेक वेळा भूकंपाचे धक्के जाणवले आहेत.

जिल्हा प्रशासनाने अद्याप भूकंप विषयी कोणतीही माहिती दिली नसून जिल्ह्यात अनेक भागात मिळालेल्या माहितीनुसार भूकंप झाल्याची चर्चा होत आहे. जिल्ह्यातील भोकर, किनवट, नायगाव ,देगलूर ,हिमायतनगर, बिलोली, कंधार, लोहा परिसरात भूकंप झाल्याची चर्चा होत आहे.

जिल्हा प्रशासनाने याबाबत अद्याप दुजोरा दिला नाही. भूकंपाचा केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी येथे असल्याचे सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR