21.1 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमहाराष्ट्रआदित्य ठाकरेंविरोधात मिलिंद देवरा मैदानात

आदित्य ठाकरेंविरोधात मिलिंद देवरा मैदानात

शिंदे, फडणवीसांनी टाकला डाव

मुंबई : प्रतिनिधी
राजधानी मुंबईतील आणि शिवसेना पक्षाच्या अस्तित्वाची लढाई असलेल्या वरळी विधानसभेत एकनाथ शिंदे यांनी अखेर मोठा डाव टाकला असून आदित्य ठाकरे यांच्याविरोधात वरळी विधानसभेत शिवसेनेकडून राज्यसभा खासदार मिलिंद देवरा यांना मैदानात उतरविण्यात आले आहे. मिलिंद देवरा सध्या राज्यसभेचे खासदार आहेत. मात्र, त्यांना आमदारकीसाठी वरळीतून मैदानात उतरवण्यात आले.

सध्या वरळी विधानसभेत विद्यमान आमदार शिवसेना ठाकरे गटाचे आदित्य ठाकरे यांच्याविरुद्ध मनसेने संदीप देशपांडे यांना उमदेवारी दिली आहे. त्यातच आता शिवसेना शिंदे गटाकडूनही उमदेवार उतरविण्यात आल्याने वरळी विधानसभेत तिहेरी लढत फायनल झाली आहे. वरळीकरांना अनेक वर्ष न्यायाची प्रतीक्षा होती. आता आम्ही आमचे व्हिजन मांडणार, अशी पोस्ट देवरा यांनी केली.

वरळी आणि वरळीकरांना मी न्याय देऊ शकतो, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माझ्यावर दाखवला. लवकरच आम्ही वरळी मतदारसंघाबाबत आमचे पुढील धोरण जाहीर करू, असे म्हणत मिलिंद देवरा यांनी उमेदवारी जाहीर झाल्याचे जाहीर केले. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले. देवरा यांनी ट्विटरवरून आपल्या उमेदवारीबाबत स्वत: माहिती दिली. गेल्या विधानसभा निवडणुकीत मनसेने आदित्य ठाकरे यांच्याविरोधात उमेदवार रिंगणात उतरवला नव्हता. मात्र, आता राज ठाकरे यांची महायुतीशी जवळीक वाढल्याने त्यांच्याकडून आदित्य ठाकरे यांच्या पराभवासाठी महायुतीला मदत केली जाऊ शकते. वरळीत मनसेकडून संदीप देशपांडे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR