19.4 C
Latur
Monday, January 20, 2025
Homeसोलापूरतेलंगणातील विजयाचा एमआयएमकडून जल्लोष

तेलंगणातील विजयाचा एमआयएमकडून जल्लोष

सोलापूर : तेलंगणा, मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड राज्याच्या निवडणूक निकालाचे पडसाद देशभरात दिसून आले आहे. लोकसभा निवडणुका होण्या अगोदर भाजपने लिटमस टेस्ट करून दाखवत तीन राज्यात एक हाती सत्ता घेतली आहे. तेलंगणात एमआयएमने सात जागांवर विजय झाल्याचा आनंद सोलापुरात एमआयएमच्या वतीने साजरा करण्यात आला.

किडवाई चौक येथे हा विजय जल्लोश साजरा केला. नसिम खलिफा, वाहेदा भंडाले, अझहर हुंडेकरी, कोमारु सय्यद, मोहसीन मैंदर्गीकर, राजा बागवान, सलमा सय्यद, अनिसा डोका, इक्बाल पठाण, जुबेर शेख, अलिशेर पटेल, नसीमा कुरेशी, शोएब चौधरी, अजहर कोरबु, याकूब शेख, मुन्ना शेख, सत्तार पैलवान, जहीर सय्यद आदी पदाधिकाऱ्यांनी लाडू भरवून विजयोत्सव साजरा केला.

तेलंगणाप्रमाणे आगामी काळात महाराष्ट्रात आणि सोलापुरात एमआयएम पक्ष मोठा विजय प्राप्त करेल, असा विश्वास फारूक शाब्दी यांनी व्यक्त केला. तेलंगणात एमआयएमने फक्त ट्रेलर दाखवला, महाराष्ट्रात पिक्चर दाखवणार असा विश्वास फारूक शाब्दी यांनी व्यक्त केला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR