शेलपिंपळगाव : शेलपिंपळगाव हद्दीतील मोहितेवाडी (ता. खेड) येथे सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ सोमवार दि. २८ एप्रिल रोजी गावात कडकडीत बंद पाळण्यात आला. तत्पूर्वी रविवारी रात्री गावातील नागरिकांनी एकत्र येऊन उघड झालेल्या लव्ह जिहाद प्रकरणाची निषेध सभा घेत सदरील घटनेविषयी रोष व्यक्त केला.
मोहितेवाडी येथे दोन दिवसांपूर्वी एका २६ वर्षीय नराधमाने सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीच्या वयाचा फायदा घेऊन वेळोवेळी तिच्या इच्छेविरुद्ध जबदस्तीने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे. नराधम आरोपी आसिम मुलाणी याने पीडित अल्पवयीन मुलीवर १६ डिसेंबर २०२४ ते २६ एप्रिल २०२५ या कालावधीत वारंवार अत्याचार केला.
झालेला प्रकार कुणाला सांगितला तर तुला व तुझ्या घरच्यांना जीवे मारून टाकण्याची धमकी देत होता. याप्रकरणी आसीम मुलानी (रा. शेलपिंपळगाव) याचेवर बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत चाकण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.