23.4 C
Latur
Thursday, February 6, 2025
Homeराष्ट्रीयमिराज २००० लढाऊ विमान कोसळले

मिराज २००० लढाऊ विमान कोसळले

कोसळताच घेतला पेट, चौकशीचे आदेश

शिवपुरी : वृत्तसंस्था
भारतीय हवाई दलाचे मिराज २००० लढाऊ विमान आज (गुरुवारी) मध्य प्रदेशातील शिवपुरी येथे कोसळले. या अपघातात लढाऊ विमानाचे दोन्ही वैमानिक जखमी झाल्याचे वृत्त आहे. अपघातानंतर लढाऊ विमानाने पेट घेतला असून, ते पूर्णत: खाक झाले आहे. त्याचा व्हिडिओही समोर आला आहे. दरम्यान २०१९ मध्ये बालाकोट एअर स्ट्राइकसह अनेक ऑपरेशन्समध्ये मिराज-२००० लढाऊ विमानांने महत्त्वाची भूमिका बजावली. या दुर्घटनेनंतर कोर्ट ऑफ इन्क्वायरीचे आदेश दिले.

मध्य प्रदेशातील शिवपुरीच्या करायरा तालुक्यात गुरुवारी दुपारी २.२० वाजता मिराज २००० लढाऊ विमान कोसळले. विमानाने नियमित प्रशिक्षण उड्डाण घेतल्यानंतर काही वेळाने ते कोसळले. अपघाताचे कारण शोधण्यासाठी कोर्ट ऑफ इन्क्वायरी करण्याचे आदेश देण्यात आले.दरम्यान, अपघातग्रस्त मिराज २००० विमानाचे वैमानिक जखमी झाले आहेत, पण ते सुरक्षित आहेत. हे लढाऊ विमान ट्विन सीटर होते. विमान अपघाताची माहिती मिळताच स्थानिक प्रशासनाने तातडीने घटनास्थळी पथक पाठवले, पोलिस घटनास्थळी दाखल झाले. विमान कोसळल्यानंतर ते पूर्णपणे जळून खाक झाले.

शिवपुरी जिल्ह्यातील बहरेता सानी गावाजवळील एका शेतात भारतीय हवाई दलाचे लढाऊ विमान कोसळल्यानंतर त्याला आग लागली. धूर दिसताच गावातील लोक घटनास्थळी धावले. काही वेळातच गावक-यांची गर्दी त्या ठिकाणी जमली. त्यांनी अपघातग्रस्त विमानाच्या वैमानिकांना बाजूला घेत त्यांना सावरले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR