22.3 C
Latur
Sunday, September 8, 2024
Homeमनोरंजनमिथुन चक्रवर्ती रुग्णालयातून घरी; पंतप्रधान मोदींनी केली विचारपूस

मिथुन चक्रवर्ती रुग्णालयातून घरी; पंतप्रधान मोदींनी केली विचारपूस

कोलकाता : तब्येत बिघडल्याने अभिनेते आणि भाजप नेते मिथुन चक्रवर्ती यांना शनिवार, १० फेब्रुवारी रोजी कोलकाता येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तब्येतीत सुधारणा झाल्यानंतर मिथुन चक्रवर्ती यांना सोमवारी १२ फेब्रुवारी रोजी रुग्णालयातून घरी जाण्याची परवानगी देण्यात आली.
आता मिथुन यांची प्रकृती पूर्णपणे ठीक आहे. पंतप्रधान मोदी यांनी देखील मिथुन यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.

एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, मिथुन यांची प्रकृती पूर्णपणे बरी आहे. मिथुन लवकरच आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात करणार असल्याची चर्चा आहे. छातीत दुखत असल्याने मिथुन चक्रवर्ती यांना १० फेब्रुवारी रोजी सकाळी कोलकाता येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे आवश्यक चाचण्या आणि रेडिओलॉजी तपासणी झाली. त्यानंतर त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू होते.

आगामी लोकसभा निवडणूक लढवणार नाही
पुढची लोकसभा निवडणूक लढवणार नसलो तरी आपण भाजपच्या निवडणूक प्रचाराचा भाग असणार असल्याचे मिथुन यांनी स्पष्ट केले आहे. येत्या १ तारखेपासूनच प्रचाराला सुरुवात करणार असल्याचे त्यांनी सांगितले. या काळात पश्चिम बंगालमधील निवडणूक प्रचाराव्यतिरिक्त इतर कोणत्याही राज्यात जावे लागले तर तेथेही जायची आपली तयारी असल्याचे ते म्हणाले.

मोदी यांच्याकडून तब्येतीची विचारपूस
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फोन करून प्रकृतीची विचारपूस केल्याचे मिथुन चक्रवर्ती यांनी सांगितले. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी प्रकृतीची काळजी न घेतल्याबद्दल दम दिल्याचे मिथुन म्हणाले. हॉस्पिटलमधून बाहेर पडताना मिथुन चक्रवर्ती म्हणाले, मी पूर्णपणे ठीक आहे. मात्र, मला माझ्या खाण्याच्या सवयींवर नियंत्रण ठेवावे लागेल. मी लवकरच कामाला सुरुवात करू शकतो आणि कदाचित मंगळवारपासून कामाला सुरुवात करेन. मिथुन यांनी हिंदी, बंगाली, ओरिया, भोजपुरी आणि तमिळ भाषेतील सुमारे ३५० चित्रपटांमध्ये काम केले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR