21.5 C
Latur
Monday, January 20, 2025
Homeमहाराष्ट्रआमदार प्रकाश आवाडे हातकणंगले लोकसभेच्या रिंगणात

आमदार प्रकाश आवाडे हातकणंगले लोकसभेच्या रिंगणात

कोल्हापूर : हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची घोषणा इचलकरंजीचे अपक्ष आमदार प्रकाश आवाडे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केली. नरेंद्र मोदी यांना तिस-यांदा पंतप्रधान करण्यासाठी ही निवडणूक लढवत असल्याचे आवाडे यांनी जाहीर केले. यामुळे या लोकसभा मतदारसंघाची निवडणूक पंचरंगी होणार आहे. आमदार आवाडे यांच्यासोबत जनसुराज्य शक्ती पक्षाचे संस्थापक आमदार विनय कोरे व शिरोळचे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर हे राहणार असल्याचा दावा करण्यात आला आहे.

हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील निवडणूक वेगवेगळी वळणे घेताना दिसत आहे. याआधी महायुतीकडून शिंदे सेनेचे खासदार धैर्यशील माने हे ंिरगणात आहेत. तर त्यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी यांनी आव्हान दिले आहे. तीन दिवसापूर्वी उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेची उमेदवारी शाहूवाडी पन्हाळ्याचे आमदार सत्यजित पाटील सरूडकर यांना जाहीर केली आहे. तर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बी. सी. पाटील यांना उमेदवारी दिली आहे. ही चौरंगी लढत लोकसभा मतदारसंघात चर्चेत असताना आज त्याला आणखी वेगळे वळण मिळाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR