आमदार संतोष बांगरची आता आरटीओ अधिका-याला धमकी

हिंगोली : शिवसेना शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर हे नेहमीच विविध वक्तव्यामुळे चर्चेत असतात. अशातच आज देखील संतोष बांगर यांनी फोनवर एका आरटीओ अधिका-याची लाज काढल्याचे पाहायला मिळाले. शाळकरी ऑटोला दंड लावल्याने आमदार बांगर आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. बांगर यांनी अधिका-याला झापल्याचा व्हीडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

विद्यार्थ्यांना शाळेत घेऊन येणा-या ऑटोला आरटीओ अधिका-याने मोठ्या प्रमाणात दंड ठोठावला होता. यानंतर हे ऑटोचालक आमदार संतोष बांगर यांच्याकडे गेले. त्यांनी संबंधित आरटीओ अधिका-याची दंड मागितल्याने बांगर यांच्याकडे तक्रार केली. त्यानंतर आक्रमक झालेल्या आमदार बांगर यांनी आरटीओ अधिर्का­याला फोन करत चक्क त्या अधिका-याची लाज काढली आहे. अशा पद्धतीने दंड ठोकणार असाल तर मी आरटीओ ऑफिस ऑफिसला कुलूप लावून टाकेल असा सज्जड दम आमदार संतोष बांगर यांनी दिला आहे. दरम्यान, अशा पद्धतने आमदार आरटीओ अधिका-याला झापताणाचा व्हीडीओ समाज माध्यमावर व्हायरल होत आहे.

शिवसेनेत एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर प्रकाशझोतात आलेले संतोष बांगर यापूर्वी अनेकवेळा आपली वादग्रस्त विधाने आणि आपल्या भूमिकांमुळे चर्चेत राहीले आहेत. शिंदे गटात सर्वांत शेवटी दाखल झालेले आमदार म्हणजे संतोष बांगर. पण त्यापूर्वी पक्षात बंड झाल्यानंतर आणि एकामोगामाग एक आमदार शिंदे गटात सामील होत असताना संतोष बांगर यांनी जाहीर कार्यक्रमात आपण उद्धव ठाकरे यांची साथ कधीही सोडणार नाही, अशी घोषणा केली होती. मात्र, त्यानंतर काही दिवसातच ते शिवसेना शिंदे गटात दाखल झाले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सत्तास्थापनेचा दावा केल्यानंतर सरकारच्या विश्वासमतासाठी विशेष अधिवेशन बोलवण्यात आले होते. त्यावेळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी संतोष बांगर उद्धव ठाकरे यांच्या बाजूने होते. परंतु दुस-या दिवशी एका रात्रीत संतोष बांगर यांनी ठाकरेंची साथ सोडली आणि ते शिंदे गटात सामील झाले.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम केले फेल

उत्तर गाजा : पेजर आणि वॉकी टॉकी मध्ये केमिकल...

नाशिकमध्ये भाजपला भगदाड!

नाशिक : प्रतिनिधी नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला...

निवडणुकीचे विविध साहित्य, सामग्रीचे दर निश्चित

लातूर : प्रतिनिधी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत विविध राजकीय पक्ष, उमेदवार...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Nanded|काँग्रेसचा उमेदवार असता तर माघार घेतली असती; उबाठाला जागा सुटल्याने निवडणूक लढणार– इंगोले
01:20
Video thumbnail
जळकोट तालुक्यात वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसाची हजेरी; वातावरणात पसरला गारवा
00:49
Video thumbnail
Latur|आमदार पुत्र ऋषिकेश कराड यांच्यावर जमीन खोदल्याचा आरोप; शेतकऱ्याची पोलीस अधीक्षकांकडे तक्रार!
05:03
Video thumbnail
Nanded|प्रवीण पाटील चिखलीकर यांची विधान परिषद निवडणुकीतून माघार
08:45
Video thumbnail
Nanded|नांदेड विधान परिषद निवडणुकीतून माधवराव पाटील जवळगावकर यांची माघार
02:21
Video thumbnail
Nanded|अर्धापुरात दमदार पावसाची हजेरी; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा
01:16
Video thumbnail
Latur|भूकंपग्रस्ताची तहसीलदारांकडून हेळसांड? न्यायासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात ठिय्या
01:38
Video thumbnail
Latur|अहिल्यादेवी जयंती न साजरी केल्याने ग्रामसेवकांवर कारवाईची टांगती तलवार
03:57
Video thumbnail
RCC CLASSES|फी परत करा, परवाना रद्द करा; RCC विरोधात हजारोंच्या आंदोलनाचा इशारा
01:27
Video thumbnail
सोलापुरात विषारी मद्यविरोधात प्रशासनाची धडक कारवाई; २४ लाखांचा मुद्देमाल जप्त, ‘झिरो टॉलरन्स’चे धोरण
03:08
Video thumbnail
मोहोळ-वैराग रस्ता रुंदीकरण: मोबदल्याशिवाय काम नको! बाधित शेतकऱ्यांचा तीव्र विरोध; हायकोर्टात धाव
02:23
Video thumbnail
Latur|तहसीलदारांसमोरच अंगावर पेट्रोल ओतल्याने खळबळ;पाच महिन्यांपासून प्रकरण प्रलंबित असल्याचा आरोप
01:56
Video thumbnail
Shivraj Motegavkar|कुलकर्णीच्या प्रॉपर्टीवर बुलडोजर;मोटेगावकरच्या इमारतीवर कारवाई कधी?"
02:48
Video thumbnail
Latur Airport|लातूर विमानतळ विकासाला गती; उद्योग-पर्यटन क्षेत्राला मोठा फायदा
03:39
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये भोंदूबाबाचा भांडाफोड;खोपेगावातील कथित बाबाचा दरबार बंद
03:01

Latest news