23.9 C
Latur
Saturday, July 27, 2024
Homeमहाराष्ट्रमनसेत धुसफूस, माजी आमदार परशुराम उपरकर पक्षातून बाहेर

मनसेत धुसफूस, माजी आमदार परशुराम उपरकर पक्षातून बाहेर

सिंधुदुर्ग : आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे संघटनेच्या बळकटीकरणासाठी सक्रीय झाले आहेत. त्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यात मनसेतील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर आली.

मागील काळात राज ठाकरेंचा कोकण दौरा झाल्यानंतर या ठिकाणची जिल्हा कार्यकारणी बरखास्त करण्यात आली होती. तेव्हापासून पक्षाचे सरचिटणीस परशुराम उपरकर नाराज होते. अखेर आज मनसे कार्यालयाने पत्रक काढून परशुराम उपरकर आणि प्रविण मर्गज यांचा पक्षाशी कुठलाही संबंध नाही असे जाहीर केले.

मनसे नेते शिरीष सावंत यांनी पत्र काढून म्हटले की, राज ठाकरे यांच्या आदेशाने परशुराम उपरकर, प्रविण मर्गज यांचा यापुढे महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षासोबत कोणताही संबंध असणार नाही, संबंधितांनी याची नोंद घ्यावी असं कळवले आहे. निवडणुकीच्या काळात मनसे संघटना मजबूत करण्यासाठी प्रयत्नशील आहे. परंतु अंतर्गत नाराजीमुळे पक्षातील नेते, पदाधिकारी पक्षाला रामराम करत आहेत.

परशुराम उपरकर हे मनसेचे सरचिटणीस होते. मात्र राज ठाकरेंच्या कोकण दौ-यावर उपरकर हे नाराज होते. गेल्या वर्षभरापासून परशुराम उपरकरांनी पक्षाच्या कुठल्याही कार्यक्रमात किंवा व्यासपीठावर गेले नाहीत. बैठकांना हजर राहिले नाहीत. माजी आमदार म्हणून ते मतदारसंघात कार्यरत राहिले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR