20.7 C
Latur
Saturday, October 26, 2024
Homeमहाराष्ट्रमनसेची १५ उमेदवारांची पाचवी यादी जाहीर

मनसेची १५ उमेदवारांची पाचवी यादी जाहीर

शिंदेसेना मनसेत छुपी युती सोलापूर, कोल्हापूर, बीडमध्ये कोणाला संधी?

मुंबई : येत्या विधानसभा निवडणुकीत मनसे स्वबळावर निवडणूक लढवत असून आतापर्यंत ४ उमेदवार याद्या मनसेने जाहीर केल्यात. आज मनसेची पाचवी उमेदवार यादी घोषित झाली असून त्यात कोल्हापूर, बीड, नागपूर, रायगड, सोलापूर जिल्ह्यातील काही जागांचा समावेश आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यातील जवळीक गेल्या काही महिन्यांत वाढल्याचे चित्र आहे. त्यामुळेच की काय कोपरी-पाचपाखाडी, अंबरनाथ, कल्याण (पूर्व) अशा काही विधानसभा मतदारसंघांत संधी असूनही मनसेने शिंदेसेनेविरुद्ध उमेदवार दिले नसल्याचे मत राजकीय निरीक्षकांमध्ये व्यक्त होत आहे. डोंबिवलीत मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याविरोधातही उमेदवार दिलेला नसल्यामुळे महायुतीचे नेते व मनसे यांच्यात छुपी युती झाल्याची चर्चाही येथे सुरू आहे.

मनसेच्या पाचव्या यादीत कोणाचा समावेश?
पनवेल – योगेश चिले
खामगाव – शिवशंकर लगर
अक्कलकोट – मल्लिनाथ पाटील
सोलापूर शहर मध्य – नागेश पासकंटी
जळगाव जामोद – अमित देशमुख
मेहकर – भैय्यासाहेब पाटील
गंगाखेड – रुपेश देशमुख
उमरेड – शेखर टुंडे
फुलंब्री – बाळासाहेब पाथ्रीकर
परांडा – राजेंद्र गपाट
उस्मानाबाद – देवदत्त मोरे
काटोल – सागर दुधाने
बीड – सोमेश्वर कदम
श्रीवर्धन – फैझल पोपेरे
राधानगरी – युवराज येडुरे

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR