22.3 C
Latur
Sunday, September 8, 2024
Homeमहाराष्ट्रमोदी सरकार लोकशाहीचा गळा घोटतेय

मोदी सरकार लोकशाहीचा गळा घोटतेय

मुंबई : वेलमध्येही न उतरता जागेवर उभे राहून प्रश्न विचारणा-या १४१ खासदारांना निलंबित करीत नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार लोकशाहीचा गळा घोटत आहे, असा आरोप करीत कॉँग्रसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केंद्र सरकारवर टीकेची झोड उठविली.

विधानभवन परिसरात पत्रकारांशी बोलताना पटोले म्हणाले, एकतर्फी निर्णय घेऊन केंद्र सरकार विरोधी पक्षाच्या खासदारांना निलंबित करीत आहे. अशा रीतीने देशाच्या इतिहासात प्रश्न विचारणा-या खासदारांना कधीही निलंबित करण्यात आलेले नाही.

ही लोकशाहीची नुसती थट्टा नसून तिचा खून केल्यासारखे आहे. महाराष्ट्रच नव्हे तर देशातील अनेक विधानसभांमध्ये याचे पडसाद उमटले आहेत. राज्यातही याहून वेगळे चित्र नाही. विरोधकांचा आवाज दाबण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केंद्र आणि भाजापा सरकार करीत आहे. विरोधकांनी कोणताही प्रश्न उपस्थित केला तर त्यांना विधानभवन आणि परिषदेत आपले म्हणणे देखील मांडू दिले जात नाही. त्यामुळे केंद्र सरकारच्या या कृतीचा आपण निषेध करतो, असेही नाना पटोले म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR