31 C
Latur
Wednesday, January 22, 2025
Homeमहाराष्ट्रमोदी म्हणजे गुजरातचे जॉनी लिव्हर

मोदी म्हणजे गुजरातचे जॉनी लिव्हर

मुंबई (प्रतिनिधी)
भ्रष्टाचा-यांवर कारवाई करणार असे पंतप्रधान मोदी यांनी मेरठ येथील सभेत ठणकावले. हा विनोद ते दररोज करत असतात. भ्रष्टाचा-यांना सोडणार नाही, असे म्हणतात तेव्हा त्यांच्या आजूबाजूलाच १० भ्रष्टाचारी नेते बसलेले असतात. जॉनी लिव्हरनंतर हे गुजरातचे लिव्हर जनतेचे मनोरंजन करत आहेत, अशी जळजळीत टीका शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी आज केली.

भाजपा हा देशातील सर्वात भ्रष्टाचारी पक्ष आहे. ंिहमत असेल तर त्यांनी निवडणूक रोख्यांच्या भ्रष्टाचारावर बोलावे, असे आव्हान त्यांनी दिले. रिझर्व्ह बँकेच्या ९० व्या वर्धापन दिन कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी मुंबई दौ-यावर आले होते. त्यांच्या या दौ-यावर शिवसेना (उबाठा) नेते खा. संजय राऊत यांनी तिखट शब्दात टीका केली. निवडणुका जाहीर झाल्यानंतरही पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारी यंत्रणा वापरत आहेत.

सरकारी विमान, सरकारी हेलिकॉप्टर घेऊन फिरत आहेत. आचारसंहिता ही केवळ विरोधी पक्षासाठी आहे का ? नोटीसा फक्त आम्हालाच देणार का ? असा सवाल राऊत यांनी केला. मोदी मुंबईत दहा सभा घेणार आहेत म्हणे. पण त्यांनी दहा नाही शंभर सभा घेतल्या तरी काही फरक पडणार नाही. मुंबईतून भाजपला पूर्णपणे तडीपार करायचे असे मुंबईच्या जनतेने ठरवलं आहे, असा टोला त्यांनी लगावला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR