22.4 C
Latur
Monday, September 16, 2024
Homeराष्ट्रीयमोदींनी पंतप्रधानपदाची प्रतिष्ठा घालवली

मोदींनी पंतप्रधानपदाची प्रतिष्ठा घालवली

नवी दिल्ली : लोकसभा निवडणूक अंतिम टप्प्यात आली आहे. सातव्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान येत्या १ जून रोजी होणार आहे. तत्पूर्वी, भारताचे माजी पंतप्रधान आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ. मनमोहन सिंग यांनी या मतदानापूर्वी मतदारांना विशेष आवाहन करण्यासाठी एक पत्र लिहिले आहे. या पत्रातून त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही जोरदार टीका केली आहे.

डॉ. मनमोहन सिंग म्हणाले माझ्या प्रिय नागरिकांनो, सध्या भारत एका गंभीर वळणावर उभा आहे. मतदानाच्या या अंतिम टप्प्यात निरंकुश राजवटीचा अंत करुन आपल्या लोकशाहीचे आणि संविधानाचे रक्षण करण्याची ही शेवटची संधी आहे. पंजाब आणि पंजाबी हे योद्धे आहेत. आपण आपल्या त्यागाच्या भावनेसाठी ओळखले जातो. लोकशाही व्यवस्थेवरील आपला एकोपा, सौहार्द आणि जन्मजात विश्वास आपल्या महान राष्ट्राचे रक्षण करू शकतो. मनमोहन सिंग यांनी आपल्या पंतप्रधान मोदींवरही टीका केली. ते म्हणाले मी या निवडणुकीतील राजकीय चर्चा अतिशय काळजीपूर्वक ऐकतोय. पंतप्रधान मोदींनी अतिशय द्वेषपूर्ण भाषणे दिली आहेत, जी पूर्णपणे फूट पाडणारी आहेत. नरेंद्र मोदी पहिले पंतप्रधान आहेत, ज्यांच्यामुळे पंतप्रधानपदाची प्रतिष्ठा आणि गांभीर्य कमी झाले. याआधी कोणत्याही पंतप्रधानाने माझ्याविरुद्ध अशी घृणास्पद, असंसदीय आणि खालची भाषा वापरली नाही.

भाजपने पंजाबची बदनामी केली
मनमोहन सिंग पुढे लिहितात गेल्या दहा वर्षांत भाजप सरकारने पंजाब आणि पंजाबच्या जनतेला बदनाम करण्यात कोणतीही कसर सोडली नाही. पंजाबमधील शेतकरी अनेक महिने दिल्लीच्या सीमेवर आंदोलनाला बसले, ७५० शेतकरी शहीद झाले. सरकारने काय केले, तर त्यांच्यावर हल्ला केला. संसदेत शेतक-यांना आंदोलनजीवी आणि परजीवी म्हटले गेले. मोदींनी २०२२ पर्यंत शेतक-यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे आश्वासन दिले होते, मात्र उलट १० वर्षांत शेतक-यांचे उत्पन्न घटले अशी टीकाही त्यांनी या पत्रातून केली.

सरकारचे अनेक निर्णय चुकले
मनमोहन सिंग यांनीही पत्रात मोदी सरकारच्या धोरणांवर टीका केली आहे. त्यांनी लिहिले की, गेल्या १० वर्षांत देशाच्या अर्थव्यवस्थेत अकल्पनीय उलथापालथ झाली. नोटाबंदी, जीएसटीची चुकीची अंमलबजावणी, कोरोना लॉकडाऊनचा निर्णय, यामुळे दयनीय परिस्थिती निर्माण झाली आहे. भाजप सरकारच्या कार्यकाळात जीडीपीचा सरासरी वाढीचा दर ६ टक्क्यांहून कमी राहिला आहे, तर काँग्रेस-यूपीएच्या कार्यकाळात तो ८ टक्क्यांच्या आसपास होता असेही ते म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR