22.1 C
Latur
Sunday, September 8, 2024
Homeराष्ट्रीयआई, मी जे केलं ते योग्यच...

आई, मी जे केलं ते योग्यच…

संसदेत घुसखोरी करणा-या सागरची कुटुंबीयांशी चर्चा

नवी दिल्ली : संसदेच्या सुरक्षेचा भंग केल्याचा आरोप असलेल्या लखनौच्या सागर शर्माची चौकशी सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार काल दिल्लीहून आलेल्या स्पेशल सेल टीमने सागर शर्माची त्याच्या कुटुंबीयांशी व्हीडीओ कॉलवरून चर्चा घडवून आणली. हा संवाद सुमारे ४० मिनिटे चालला. यादरम्यान सागरने कुटुंबीयांना सांगितले की, आपण जे काही केले ते योग्यच आहे.

सागर कॉलवर म्हणाला – आई, घरी सर्व ठीक आहे का, काही अडचण आहे का?
त्यावर आई म्हणाली- तू काय केलेस?
सागर- आई, मी जे काही केले आहे ते बरोबर आहे. ते योग्य केले. मी ते कोणाच्या सांगण्यावरून केलेले नाही. चौकशीनंतर मला लवकरच सोडण्यात येईल.
मग सागर म्हणाला- आई, तुझी आणि माही(बहीण)ची काळजी घे.

संवादादरम्यान सागर शर्माने लखनौ आणि इतर काही ठिकाणच्या त्याच्या घराबाबत महत्त्वाच्या कागदपत्रांची माहिती दिली, ज्यांना पोलिसांनी सोबत नेले आहे. दिल्लीतील स्पेशल सेल टीमला सागरच्या खोलीतून ४ बँक खात्यांची पासबुक सापडली आहेत. या व्यवहाराची चौकशी करण्यात येत आहे. या खात्यांमध्ये कधी, कुठे आणि किती पैशांची देवाणघेवाण झाली, याची माहिती गोळा केली जात आहे.

याशिवाय खोलीत पॉकेट डायरी, पुस्तके, फाइल्स, तिकिटे आदी साहित्य सापडले आहे. सागरच्या वडिलांच्या स्वाक्षरीनंतर ते जप्त करण्यात आले आहेत. तपास यंत्रणेने आरोपी सागर शर्माचे आई-वडील आणि बहिणीला एकत्र बसवून चौकशी केली. याआधी यूपी एटीएसने सागरच्या कुटुंबीयांचीही चौकशी केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, यूपी एटीएस आणि इंटेलिजन्सची टीमही सागरच्या लखनौच्या घरी पोहोचली आहे आणि त्यांनी या प्रकरणाची चौकशी केली आहे. आरोपी सागर शर्मा याला बॅटरी रिक्षा देणारे नानके आणि त्याचा मुलगा हिमांशू यांचीही पथकाने चौकशी केली आहे. ज्यामध्ये सागरने बँकांशी संपर्क साधल्याचे समोर आले आहे. त्यांनी निधी उभारण्याचा प्रयत्न केला. त्याला स्वत:ची नवीन ई-रिक्षा घ्यायची होती.
नानके यांनी सांगितले की, सागर मला दररोज ५०० रुपये ई-रिक्षाचे भाडे देत असे. हा त्याचा निश्चित कोटा होता. तो सकाळी नऊ वाजता ई-रिक्षा घेऊन रात्री आणायचा. बँकेतूनही फोन आला होता. त्यावर सागरने आपल्याला पैशांची नितांत गरज असल्याचे सांगितले होते. म्हणूनच त्याला कर्ज घ्यायचे आहे. कर्जाची संपूर्ण रक्कम लवकरच फेडणार असल्याचे त्याने सांगितले होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR