नवी दिल्ली : देशाची राजधानी दिल्लीत रस्त्याच्या बाजूला मोमोज खाणे एका व्यक्तीला चांगलेच महागात पडले. येथे गुंडानी एका व्यक्तीला फक्त चटणी मागीतली म्हणून गंभीररित्या जखमी केले आहे. यानंतर त्या व्यक्तीला रुग्णालयात दाखल करण्यात आले.
दिल्ली पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार भीकम सिंह कॉलनी भागात एक व्यक्ती येथे मोमोज खात होता मात्र त्यासोबत तो जास्तीची चटणी मागत असल्याने त्याच्यावर हल्ला करण्यात आला. हल्ला करणा-या व्यक्तीने दुकानदाराची बाजू घेत हा हल्ला केल्याचे म्हटले आहे. या हल्ल्यात तो व्यक्ती गंभीररित्या जखमी झाला.
पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला. पोलीस घटनेचा तपास करत आहेत, मात्र या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.