27.4 C
Latur
Sunday, September 22, 2024
Homeअंतरराष्ट्रीयमंकीपॉक्स पाकिस्तानात पोहोचला

मंकीपॉक्स पाकिस्तानात पोहोचला

इस्लामाबाद : काही देशात मंकीपॉक्सने खळबळ उडाती आहे. आता आफ्रिकेपाठोपाठ पाकिस्तानमध्येही मंकीपॉक्सने थैमान घातले आहे. याबाबत आपल्या देशात चिंता वाढत आहे. जागतिक आरोग्य संघटनेने मंकीपॉक्सचा उद्रेक आंतरराष्ट्रीय सार्वजनिक आरोग्य आणीबाणी घोषित केला आहे. डब्ल्यूएचओचे महासंचालक डॉ. टेड्रोस गेब्रेयसस यांनी याबाबत माहिती दिली. ते म्हणाले, १५ ऑगस्ट रोजी मंकीपॉक्सवर आपत्कालीन समितीची बैठक झाली. १२ पेक्षा जास्त देशांमध्ये लहान मुले आणि प्रौढांमध्ये मांकीपॉक्सची प्रकरण समोर आली आहे यावेळी असे नोंदवले. विषाणूचा एक नवीन प्रकार पसरत आहे.

जागतिक स्तरावर एमपीओएक्सबाबतची सद्यस्थिती लक्षात घेता भारत सरकारही पूर्णपणे सतर्क आहे. मंकीपॉक्सबाबत तयारी सुरू करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या अंतर्गत, आपत्कालीन वॉर्ड तयार करणे आणि विमानतळांवर दक्षता वाढवणे यासारखी खबरदारीची पावले उचलण्यात आली आहेत. सरकारने रुग्णालयांना रॅशेस असलेल्या रुग्णांची ओळख पटविण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यांच्यासाठी आयसोलेशन वॉर्ड तयार ठेवण्यास सांगण्यात आले आहे. दिल्लीतील ३ नोडल रुग्णालये यासाठी तयार ठेवली आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, संशयित रुग्णांची आरटी-पीसीआर आणि नाकातील स्वॅब चाचणी केली जाईल. तसेच विमानतळाला आवश्यक ती खबरदारी घेण्याचा इशारा देण्यात आला आहे. काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी इतर देशांमध्ये आढळलेल्या मंकीपॉक्सच्या रुग्णांवर चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून मुंबई विमानतळावर कडक चाचणी आणि अलग ठेवण्याचे नियम लागू करण्याची मागणी केली आहे. भारतात त्याचा प्रसार रोखण्यासाठी सरकारने योग्य ती पावले उचलावीत असे आवाहन त्यांनी केले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR