27.1 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeछत्रपती संभाजीनगरसिल्लोडमध्ये सर्वाधिक नवमतदार

सिल्लोडमध्ये सर्वाधिक नवमतदार

संभाजीनगर : विशेष प्रतिनिधी
विधानसभेच्या यापूर्वीच्या प्रारूप यादीच्या तुलनेत ८६ हजार ३०८ ने मतदारसंख्या वाढून जिल्ह्यातील मतदारसंख्या ३१ लाख ७६ हजार १९७ एवढी झाली. यापैकी ७८ हजार ५७७ नवमतदार आहेत.

१ जुलै २०२४ या अर्हता दिनांकावर आधारित मतदार याद्या तयार करण्यात आल्या. प्रारूप मतदार यादी जाहीर झाली, तेव्हा जिल्ह्यातील मतदारांची संख्या ३० लाख ८९ हजार ८८९ होती. त्यात पुरुष १६ लाख १८ हजार ९४, तर महिला मतदारांची संख्या १४ लाख ७१ हजार ६५९ इतकी होती; तसेच इतर १३६ होते. प्राप्त मतदार यादीनुसार मतदारसंख्येत वाढ झाली. जिल्ह्यात १८ ते १९ वयोगटांतील नवमतदारांची संख्या ७८ हजार ५७७ आहे.

विधानसभानिहाय नवमतदार :
सिल्लोड १० हजार ८६५, कन्नड ७ हजार ४७८, फुलंब्री ८ हजार २२०, औरंगाबाद मध्य (छत्रपती संभाजीनगर) ८ हजार ८०२, पश्चिम १० हजार ३८, पूर्व ८ हजार ४३५, पैठण ७ हजार ९५०, गंगापूर ९ हजार ९२, तर वैजापूर विधानसभा मतदारसंघात ७ हजार ६९७ नवमतदार आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR