लातूर : प्रतिनिधी
एकमतच्या सर्वेसर्वा श्रीमती वैशालीताई देशमुख (आईसाहेब) यांचे नेहमीच शेतीत नवनवीन प्रयोग सुरू असतात. आता त्यांनी कृत्रिम प्रकाशात ड्रॅगन फ्रूटची शेती केली आहे. यासंदर्भात देशमुख कुटुंबीयांच्या स्नुषा आणि लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष धिरज विलासराव देशमुख यांच्या पत्नी दीपशिखा देशमुख यांनी इन्स्टाग्रामवरुन एक व्हीडीओ शेअर केला आहे.
यात दीपशिखा देशमुख आणि धिरज देशमुख यांनी त्यांच्या मुलांसह आईसाहेबांसमवेत कृत्रिम प्रकाशात ड्रॅगन फ्रूटचे पीक घेतलेल्या शेतात भेट दिली. यात बल्बच्या प्रकाशात त्यांनी ड्रॅगन फ्रूटचे उत्पादन कसे घेतले आहे, याचा अंदाज येतो. याबाबत त्यांनी नातवांना माहिती दिली.
शेती करत असताना त्यात सातत्याने नवनवीन प्रयोग करण्याचा प्रयत्न आदरणीय आईसाहेब नेहमी करत असतात, याचा आम्हाला खूप अभिमान वाटतो. बाभळगाव येथील शेतीमध्ये आईंनी कृत्रिम प्रकाशाच्या माध्यमातून ड्रॅगन फ्रूट उत्पादनाची नवी संकल्पना राबवली. वंश व दिवियाना यांना याविषयी माहिती मिळावी, यासाठी आम्ही प्रत्यक्षात तिथे भेट दिली. वंश व दिवियाना यांना आजीमां व धिरज देशमुख यांनी सविस्तरपणे माहिती दिल्याचे त्यांनी यात म्हटले आहे.

