जिंतूर : शहरातील अण्णाभाऊ साठे चौकात मातंग समाजाच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले. यावेळी मागण्यांचे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले.
मातंग समाजाच्या विविध मागण्यांसाठी लहुजी शक्ती सेनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णू कसबे यांनी पुणे ते नागपूर पाचव्या वेळी पदयात्रा करत आहेत म्हणून त्यांना पाठिंबा देण्यासाठी शहरातील लहुजी शक्ती सेनेच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत अण्णाभाऊ साठे चौकात धरणे आंदोलन केले. यावेळी अनुसूचित जातीचे अ ब क ड वर्गीकरण करणे, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न देणे, बार्टीच्या धर्तीवर आर्टीची स्थापना करणे, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाला १००० कोटी रुपये देणे, सामाजिक, आर्थिक, राजकीय व शैक्षणिक आरक्षण देण्यात यावे अशा मागण्यांचे निवेदन तहसीलदार राजेश सरोदे यांना देण्यात आले.
या निवेदनावर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते, युवक जिल्हाध्यक्ष रमेश मोहिते, रावण मोहिते, गणेश पारवे, सुनील सुतार, मच्छिंद्र कांबळे, आकाश थोरात, बालाजी पारवे, भारत मोहिते, कैलास मोहिते, भीमराव हजारे, भारत मुजमुले, नितीन वाणी, गणेश मोहिते, संतोष बोंडे, राहुल उफाडे, दिनेश कांबळे, सुभाष नाईक, विशाल खरात आदींच्या सह्या आहेत. यावेळी पोलीस निरीक्षक दिलीप तिडके यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.