28.9 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeसोलापूरसोलापूर येथे हिंदुराष्ट्र समन्वय समितीच्यावतीने आंदोलन

सोलापूर येथे हिंदुराष्ट्र समन्वय समितीच्यावतीने आंदोलन

सोलापूर : बांगलादेशात आरक्षणाच्या सूत्रावरून प्रारंभ झालेल्या हिंसाचारात जाणीवपूर्वक हिंदूंना लक्ष करून त्यांच्या उघडपणे हत्या करणे, हिंदूंच्या घरांवर आक्रमणे करणे, हिंदूंची दुकाने लुटणे, हिंदूंच्या मंदिरांची तोडफोड करणे आग लावणे, हिंदु महिलांवर बलात्कार करणे, हिंदूंना विस्थापित करणे आदी अत्याचार केले जात आहे.

या संदर्भात बांगलादेशी सैन्यदलाने जरी हिंदूंचे रक्षण करण्याचे आश्वासन दिले असेल, तरी भारत सरकारने त्यावर विसंबून न रहाता हिंदुं समाजाच्या आणि मंदिरांच्या रक्षणासाठी तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी हिंदुराष्ट्र समन्वय समितीच्या माध्यमातून आयोजित आंदोलनात करण्यात आली. जिल्हा परिषद, पूनम गेट येथे हे आंदोलन करण्यात आले.आंदोलनाच्या शेवटी मागण्याचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR