अहिल्यानगर : प्रतिनिधी
अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीच्या उर्वरित १० जागांसाठी सुरू असलेल्या मतमोजणीत पहिला मोठा निकाल समोर आला आहे. संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या पारनेर सेवा सहकारी संस्था मतदारसंघातून खासदार निलेश लंके यांनी विजय मिळवला आहे.
पारनेर मतदारसंघात खासदार निलेश लंके (लंके-लोखंडे गट) आणि माजी खासदार डॉ. सुजय विखे यांचे निकटवर्तीय राहुल शिंदे (सहकार पॅनल) यांच्यात अत्यंत अटीतटीची लढत झाली. या निवडणुकीत एकूण १०४ मतदारांपैकी निलेश लंके यांना ६३ मते मिळाली, तर राहुल शिंदे यांना पराभवाचा सामना करावा लागला. जिल्हा बँकेच्या सत्तेसोबतच ही राजकीय प्रतिष्ठेची लढाई मानली जात होती, ज्यामध्ये अखेर निलेश लंके यांनी आपले वर्चस्व सिद्ध केले आहे.
धन्यवाद मायबाप जनता : लंके
जिल्हा बँकेच्या संचालकपदी निवडून आल्यावर खासदार निलेश लंके यांनी फेसबुक पोस्ट करत विखे पाटील यांना टोला लगावला आहे. निलेश लंके म्हणाले की, असतील तुमच्याकडे करोडो रुपयांचे कारखाने, शिक्षणसंस्था, गडगंज संपत्ती.. पण माझ्याकडे तुमच्या पैशाने सुद्धा विकत न घेऊ शकणारी कोहिनूर माणसे आहेत..
















