सोलापूर : सोलापुर जिल्हा परिषद आवारालगतच्या खोकेधारकांचे खोके कायम करण्याबाबत खासदार प्रणिती शिंदे यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्यांनी पत्र दिले आहे.
सोलापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषद आवारालगतच्या खोके व गाळे धारकांचे व्यवसाय कार्यामधील कामकाजांशी संबंधित असल्याने गाळ्यासाठी जागा उपलब्ध करुन कायम करावे. त्यास अनुसरुन दि. ११ नोव्हेबर २०१३ रोजी जिल्हाधिकारी यांच्याकडे संबंधितांची संयुक्त बैठक पार पडली होती. यामध्ये जिल्हा परिषदेच्या कंपाऊंड लगत असणा-या पार्किंगच्या वरिल भागावर कवडे पार्किंग करुन पहिल्या मजल्यावर खोकेधारकांना गाळे बांधुन देण्यास ठरले होते याकरिता लागणारा निधी खोकेधारक स्वतः जिल्हा परिषदेकडे जमा करतील व जिल्हा परिषद गाळेधारकांना भाडे आकारुन ते वसुल करेल असे ठरले होते.
याकरिता जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेचा ठराव गरजेचा असल्याने तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी यानी निदर्शनास आणुन दिल्यानंतर तात्कालीन जिल्हाधिकारी यांनी मंत्रालयीन बैठकीस अनुसरुन जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेचा प्रस्ताव मान्यतेसाठी सादर करावा अशा सुचना दिल्या होत्या परंतु अद्यापपर्यंत याबाबतची कार्यवाही झालेली नसल्याचे तेथील नागरिकांनी निवेदन दिलेले आहे.
तरी सोलापुर जिल्हा परिषद आवारालगतच्या खोकेधारकांचे खोके कायम करणेबाबत संबंधितांना आदेश व्हावेत असे पत्र खासदार प्रणिती शींदे यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्यांना दिले आहे.