परभणी : पुणे येथे दि.१५ फेब्रुवारी रोजी एका विशेष समारंभात मृत्युंजयकार शिवाजी सावंत यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिला जाणारा २०२३चा मृत्युंजय साहित्य पुरस्कार ह्यतिटाह्ण या कादंबरीसाठी परभणी येथील साहित्यीक बा.बा.कोटंबे यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला आहे.
महाराष्ट्र कामगार साहित्य परिषद, महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा भोसरी व गणेश इंटरनॅशनल स्कूल चिखली यांच्या संयुक्त विद्यमाने ३१वा गदिमा काव्य महोत्सव पुणे येथे इंद्रायणीच्या काठी इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेच्या सभागृहात दि.१५ फेब्रुवारी रोजी संपन्न झाला. याच समारंभात अखिल भारतीय मराठी साहित्य संंमेलनाचे माजी अध्यक्ष ज्येष्ठ कवी प्रा. फ.मुं.शिंदे यांच्या हस्ते साहित्यीक श्री.कोटंबे यांना पुरस्काराने गौरविण्यात आले. याप्रसंगी कवी रामदास फुटाणे, पद्मश्री गिरीश प्रभुणे, ज्येष्ठ साहित्यीक जगदीश कदम, संस्कृती प्रकाशनच्या सुनिताराजे पवार यांची उपस्थिती होती. कोटंबे यांच्या मुसाफिर, पैंजण, काळरात्र, अंधार, झावळ, तिटा, कदाचित या कादंबरी तसेच सांज पावसाळी, पालवी, बयनामा कथासंग्रह प्रकाशित झाले आहेत.