24 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeराष्ट्रीयजगदीप धनखड यांचा खूप आदर; दुखावण्याचा हेतू नाही : कल्याण बॅनर्जी

जगदीप धनखड यांचा खूप आदर; दुखावण्याचा हेतू नाही : कल्याण बॅनर्जी

नवी दिल्ली : संसदेच्या संकुलात उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची मिमिक्रीवरून राजकारण चांगलेच तापले आहे. पंतप्रधान मोदींनीही या प्रकरणावर दुःख व्यक्त केले आहे. उपराष्ट्रपती धनखड यांच्याशीही त्यांनी फोनवर चर्चा केली आहे. आता या प्रकरणावर टीएमसी खासदार कल्याण बॅनर्जी यांनी प्रथमच आपली प्रतिक्रिया दिली आहे. कल्याण बॅनर्जी म्हणाले की, मी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचा खूप आदर करतो. त्यांना दुखवण्याचा माझा कोणताही हेतू नव्हता. जो मिमिक्रीचा संबंध आहे, ती एक कला आहे.

बॅनर्जी पुढे म्हणाले की, मी असे म्हटलो माही की लोकसभा किंवा राज्यसभा सुरु आहे. एक बनावट संसद सुरू होती. जर त्यांनी ते स्वतःवर घेतले असेल तर मी खरोखरच असहाय्य आहे. खरच ते राज्यसभेत असे वागतात का? २०१४-२०१९ या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत मिमिक्री केली होती असा दावाही त्यांनी केला. कल्याण बॅनर्जी म्हणाले की मिमिक्री फक्त मीच केली नव्हती. गेल्या टर्ममध्ये पंतप्रधान मोदींनी लोकसभेत मिमिक्रीही केली होती. पण त्यावेळी कोणीही ते तितक्या गांभीर्याने घेतले नाही, असे ते म्हणाले.

मिमिक्रीवरून भाजप आक्रमक झाली असून या वादाच्या पार्श्वभूमीवर भाजपसह एनडीएचे सर्व राज्यसभा खासदार उपराष्ट्रपतींशी एकजूट दाखवण्यासाठी अनोखे आंदोलन केले आहेत. एनडीएचे १०९ सदस्य उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांच्या सन्मानार्थ राज्यसभेत तासभर उभे होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR