23.7 C
Latur
Thursday, June 27, 2024
Homeधाराशिवअपयशी केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात काँग्रेसचे चिखलफेक आंदोलन

अपयशी केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात काँग्रेसचे चिखलफेक आंदोलन

धाराशिव : केंद्रातील भाजप सरकार व राज्यातील महायुती सरकारच्या गलथान कारभारामुळे नीट परीक्षेच्या पेपर फुटी व निकालातील गैरव्यवहारामुळे देशातील लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधकारमय होऊन धोक्यात गेले आहे. विशेष म्हणजे राज्यातील पोलिस भरती चक्क चिखलात सुरू आहे. तसेच विविध मागण्यासाठी या दोन्ही अपयशी सरकारच्या विरोधात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आय कमिटीच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र संताप व्यक्त करीत दि. २१ जून रोजी चिखलफेक आंदोलन करुन निषेध केला.

दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, पीक कर्ज वसुलीसाठी शेतकऱ्यांची खाती गोठवण्यात येत आहेत. कर्जासाठी शेतकऱ्यांची होत असलेली अडवणूक. तसेच कांदा, कापूस व सोयाबीनसह कोणत्याही शेतमालाला कवडीमोल भाव असून हमीभाव कायद्याप्रमाणे भाव देण्यास उदासीनता. तर राज्यात खते, बी- बियाणांचा काळाबाजार बोकाळला असून कर्जासाठी शेतकऱ्यांची अडवणूक केली जात आहे. विशेष म्हणजे महीला व मुलींचे दिवसाढवळ्या रस्त्यावर खुन पडले जात आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR