श्रीनगर : पीडीपी प्रमुख मेहबुबा मुफ्ती यांच्या कारचा भीषण अपघात झाला. विशेष म्हणजे दुर्घटनेवेळी त्या गाडीमध्येच होत्या. सुदैवाने त्यांना कसलीही दुखापत झालेली नाही.
मेहबुबा मुफ्ती या जम्मू आणि काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्याकडे जात होत्या. यावेळी एका नागरिकाच्या गाडीशी त्यांची कार धडकली. या अपघातात त्या थोडक्यात बचावल्या आहेत. त्यांना अपघातात कसलीही दुखापत झाली नसल्याची माहिती देण्यात आली आहे. मुफ्ती यांचा सुरक्षारक्षक कारमध्येच होता. त्याला किरकोळ दुखापत झाल्याची माहिती आहे.