30.6 C
Latur
Saturday, March 2, 2024
Homeउद्योगमुकेश अंबानी होणार १०० चॅनल्सचे मालक!

मुकेश अंबानी होणार १०० चॅनल्सचे मालक!

नवी दिल्ली : मुकेश अंबानी यांच्या इंडियन मीडिया इंडस्ट्रीजचे नाव सर्वात मोठे होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. एक करार होताच दिग्गज उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या खिशात देशातील १०० हून अधिक चॅनल्स येतील आणि सोबतच दोन स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म हाती येतील.

मुकेश अंबानी यांची रिलायन्स इंडस्ट्रीज आणि वॉल्ट डिस्ने यांचे विलिनीकरण जवळपास निश्चित मानण्यात येत आहे. दोन्ही कंपन्यांची बोलणी आता अंतिम टप्प्यात पोहचली आहे. स्टार इंडिया आणि वायकॉम18 च्या या विलिनीकरणात १०० हून अधिक टीव्ही चॅनल आणि दोन स्ट्रीमींग प्लॅटफॉर्मचा समावेश होईल.

कोणाचा वाटा किती
स्टार-वायकॉम18 मध्ये या करारानंतर रिलायन्सचा वाटा ५१ टक्क्यांहून अधिक वाढेल. तर दुसरीकडे डिस्नेमध्ये हा वाटा ४० टक्क्यांचा घरात पोहचेल. तर उदय शंकर आणि जेम्स मर्डोक यांच्या बोधी ट्री सिस्टम्सचा वाटा ७-९ टक्क्यांच्या घरात जाईल. स्टार आणि वायकॉम18 ने ३१ मार्च, २०२३ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात २५,००० कोटींचा महसूल कमवला.

या नवीन कंपनीकडे केवळ टीव्ही आणि डिजिटलचेच हक्क असतील असे नाही. तर इंडियन सुपर लीग आणि प्रो कबड्डी लीगचा पण हक्क असेल. संबंधित अधिका-यांच्या मते, क्रिकेट प्रक्षेपण अधिकारातून होणारा तोटा, डिस्ने आणि हॉटस्टार ग्राहकांच्या घसरणीचा विचार करत रिलायन्स स्टार इंडियाचे मूल्यांकन ४ अब्ज डॉलर ठरवू शकते. तर दोघांच्या या नवीन कंपनीचे मूल्यांकन ८ अब्ज डॉलर होईल.

गुंतवणूकदार मालामाल होतील

सोमवारी रिलायन्स इंडस्ट्रीचा शेअर ३,००० रुपयांचा टप्पा ओलांडण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे कंपनीचे बाजारातील भांडवल २० लाख कोटी रुपये होईल. या डीलचा मोठा फायदा रिलायन्स समूहाला होईल. तसेच गुंतवणूकदार पण मालामाल होतील.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR