40.1 C
Latur
Monday, May 20, 2024
Homeराष्ट्रीयकेंद्र सरकारचा कर्मचारी, पाकिस्तानी ‘आयएसआय’साठी करत होता काम

केंद्र सरकारचा कर्मचारी, पाकिस्तानी ‘आयएसआय’साठी करत होता काम

नवी दिल्ली : भारतीय परराष्ट्र मंत्रालयात कार्यरत असलेला कर्मचारी पाकिस्तानला भारतीय लष्कराची माहिती देत होता. मॉस्कोत कार्यरत असलेला हा कर्मचारी २०२१ पासून आयएसआयला माहिती पुरवत होता. त्याला उत्तर प्रदेश एटीएसने अटक केली आहे.

मेरठमध्ये ही कारवाई करण्यात आली. सतेंद्र सिवाल नावाच्या या एजंटने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. आयएसआय एजंट असलेला सतेंद्र हा मॉस्कोतील भारतीय दुतावासात इंडियन बेस्ड सिक्योरिटी असिस्टेंट पदावर कार्यरत होता.

आयएसआय एजंट झालेला सतेंद्र याच्यासंदर्भात उत्तर प्रदेश एटीएसला इनपुट मिळाले होते. आयएसआय पराराष्ट्र मंत्रालयातील कर्मचा-यास हनी ट्रॅप आणि पैशांचे आमिष देऊन माहिती घेतली जात होती. त्यानंतर एटीएसने तपास सुरु केला. त्यात सतेंद्र सिवाल हा आयएसआयला माहिती देत असल्याचे उघडकीस आले. त्याने भारतीय लष्काराची गुप्त माहिती पुरवली होती.

उत्तर प्रदेशातील हापुडमध्ये राहणारा सतेंद्र याची नियुक्ती मॉस्कोतील भारतीय दुतावासात करण्यात आली होती. त्याला अटक केल्यानंतर त्यांच्याकडून दोन मोबाईल, आधार कार्ड, पॅन कार्ड जप्त करण्यात आले.

आयएसआय हँडलर्स म्हणून काम करणारा सतेंद्र याने भारतीय दूतावास, संरक्षण मंत्रालय, परराष्ट्र मंत्रालय आणि भारतीय लष्करी संस्थेची महत्त्वाची गोपनीय माहिती पाठवल्याचा आरोप आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR