32.6 C
Latur
Friday, April 18, 2025
Homeक्रीडामुंबई इंडियन्स दिमाखात फायनलमध्ये

मुंबई इंडियन्स दिमाखात फायनलमध्ये

गुजरात जाएंट्सचा खेळ खल्लास

मुंबई : महिला प्रीमियर लीग २०२५ च्या तिस-या हंगामात हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्स संघाने एलिमिनेटरच्या लढतीत गुजरात जाएंट्सला पराभूत करत फायनल गाठली आहे. आता १५ मार्चला मुंबई इंडियन्स महिला संघ दुस-यांदा ट्रॉफी उंचावण्याच्या इराद्याने दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या सामन्यात मैदानात खेळताना दिसेल. याधी २०२३ मध्ये पहिल्या हंगामात मुंबई इंडियन्सच्या संघाने या स्पर्धेचे जेतेपद पटकावले आहे.

एलिमिनेटरच्या लढती पहिल्यांदा फलंदाजी करताना मेथ्यू हेली आणि नॅटली सायव्हर ब्रंट यांनी केलेल्या १३५ धावांच्या भागीदारी आणि हरमनप्रीत कौरच्या १२ चेंडूतील ३६ धावांच्या खेळीच्या जोरावर मुंबई इंडियन्सच्या संघाने निर्धारित २० षटकात ४ विकेट्सच्या मोबदल्यात २१३ धावा करत गुजरात जाएंट्स संघासमोर २१४ धावांचे टार्गेट दिले होते. या धावांचा पाठलाग करताना गुजरात जाएंट्सचा संघ १९.२ षटकात १६६ धावांतच आटोपला. मुंबई इंडियन्सच्या संघाने ४७ धावांनी विजय मिळवत फायनल गाठली.

दिल्ली कॅपिटल्सचा संघ सलग तिस-यांदा फायनलमध्ये पोहचला आहे. पण त्यांना अजूनपर्यंत ट्रॉफी जिंकता आलेली नाही. २०२३ च्या पहिल्या हंगामात दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स महिला संघ यांच्यातच फायनलचा सामना रंगल्याचे पाहायला मिळाले होते. त्यावेळी मुंबई इंडियन्सनं बाजी मारत पहिल्या ट्रॉफीवर नाव कोरलं. २०२४ च्या दुस-या हंगामातही दिल्ली कॅपिटल्सचा संघ फायनलमध्ये पोहचला. पण गत हंगामात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघाने त्यांना शह दिला. आता पुन्हा दिल्ली कॅपिटल्स महिला संघासमोर मुंबई इंडियन्सचे आव्हान असणार आहे. हा सामना मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर खेळवण्यात येणार असल्यामुळे हरमनप्रीत कौरच्या संघाला दुस-यांदा ट्रॉफी उंचावण्याची अधिक संधी असेल.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR