मुंबई : मुंबई इंडियन्सवर आयपीएलच्या १८ व्या मोसमातील २० व्या सामन्यात १२ धावांनी मात केली आहे. आरसीबीने मुंबईला विजयासाठी २२२ धावांचे आव्हान दिले होते. मात्र मुंबईला ९ विकेट्स गमावून २० ओव्हरमध्ये २०९ धावाच करता आल्या.
आरसीबीने यासह १० वर्षांची प्रतिक्षा संपवली. आरसीबीने वानखेडे स्टेडियममध्ये २०१५ नंतर पहिल्यांदा विजय मिळवला. तर आरसीबीचा हा या मोसमातील तिसरा विजय ठरला. तर मुंबईचा हा घरच्या मैदानातील पहिला आणि एकूण चौथा पराभव ठरला. सोमवारी आयपीएल २०२५ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने मुंबई इंडियन्स वर १२ धावांनी रोमांचक विजय मिळवला.
संघाने १० वर्षांनी वानखेडे स्टेडियमवर मुंबईला हरवले. त्यांना शेवटचा विजय २०१५ च्या हंगामात मिळाला होता. मुंबईने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. बंगळुरूने २० षटकांत ६ गडी गमावून २२१ धावा केल्या. प्रत्युत्तरात मुंबईला २० षटकांत ९ बाद २०९ धावाच करता आल्या. कर्णधार हार्दिक पंड्या (४२) आणि तिलक वर्मा (५६) यांनी ३४ चेंडूत ८९ धावांची भागीदारी करून संघाला धावांचा पाठलाग करण्यास मदत केली, परंतु हे दोघे बाद झाल्यानंतर संघाने लगेचच सामना गमावला. बंगळुरूकडून कृणाल पंड्याने ४ विकेट्स घेतल्या. यश दयाल आणि जोश हेझलवूड यांनी प्रत्येकी २ विकेट घेतल्या.
बंगळुरूकडून विराट कोहली (६७ धावा) आणि कर्णधार रजत पाटीदार (६४ धावा) यांनी अर्धशतके झळकावली. जितेश शर्माने नाबाद ४० आणि देवदत्त पडिक्कलने ३७ धावांचे योगदान दिले. ट्रेंट बोल्ट आणि हार्दिक पंड्याने प्रत्येकी २ विकेट घेतल्या. विघ्नेश पुथूरने एक विकेट घेतली.