23.7 C
Latur
Saturday, July 27, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल यांची तडकाफडकी बदली

मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल यांची तडकाफडकी बदली

- सहा राज्यांतील गृहसचिवांच्या बदल्या - निवडणूक आयोगाचा आदेश

मुंबई : प्रतिनिधी
मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल यांची बदली करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडुन मिळाली आहे. निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार ही बदली करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केल्यानंतर निवडणूक आयोगानं देशभरातील महत्वाच्या अधिका-यांच्या बदल्या केल्या आहेत.

सहा राज्यांतील गृहसचिवांच्या बदल्या
भारतीय निवडणूक आयोगाने देशभरातील अनेक अधिका-यांच्या तडकाफडकी बदल्या करण्याचे आदेश जारी केले आहेत. गुजरात, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या सहा राज्यांतील गृहसचिवांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यासह मिझोराम आणि हिमाचल प्रदेशमधील सामान्य प्रशासकीय विभागाच्या सचिवांच्याही बदल्या करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. निवडणूक आयोगाने पश्चिम बंगालच्या पोलिस महासंचालकांना (डीजीपी) काढून टाकण्याची देखील कारवाई केली आहे.

कोण आहेत इक्बालसिंह चहल?
इक्बालंिसह चहल हे १९८९ च्या बॅचचे ते आयएएस अधिकारी आहेत. मुंबई महापालिका आयुक्त पदी नियुक्ती होण्याआधी ते जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव म्हणून कार्यरत होते. चहल यांच्याकडे भारतीय प्रशासकीय सेवेचा ३० वर्षांपेक्षा अधिक प्रदीर्घ अनुभव आहे. नाशिक जिल्­हा परिषदेचे मुख्­य कार्यकारी अधिकारी, औरंगाबाद विभागाचे अतिरिक्­त आयुक्­त, औरंगाबादचे जिल्­हाधिकारी, ठाणे जिल्­हाधिकारी, पर्यावरण विभागाचे सहसचिव, धारावी पुनर्वसन प्रकल्­पाचे मुख्­य कार्यकारी अधिकारी, म्­हाडाचे उपाध्यक्ष आणि मुख्­य कार्यकारी अधिकारी, राज्­य उत्­पादन शुल्­क आयुक्­त, वैद्यकीय शिक्षण आणि औषधी विभागाचे सचिव अशी अनेक पदे इक्बाल चहल यांनी सक्षमतेने भुषवली आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR