22.1 C
Latur
Sunday, September 8, 2024
Homeमहाराष्ट्रसुमारे ५५००० पोलिस अधिकारी, कर्मचा-यांसह मतदानासाठी मुंबई सज्ज

सुमारे ५५००० पोलिस अधिकारी, कर्मचा-यांसह मतदानासाठी मुंबई सज्ज

मुंबई : महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकांचा शेवटचा टप्पा मुंबईसह उपनगरातील लोकसभा मतदारसंघातील मतदानानंतर पार पडत आहे. त्यासाठीच्या प्रचाराची सांगत आज सायंकाळी ६ वाजता झाली असून प्रशासन मतदानाच्या तयारीला लागले आहे. लोकसभा निवडणूक २०२४ च्या ५ व्या टप्प्यांतील मतदान २० मे रोजी होणार असून बृहन्मुंबई शहरामध्ये कायदा व सुव्यवस्थेच्या अनुशंगाणे मुंबई पोलिस दलाकडून ५ अपर पोलिस आयुक्त, २५ पोलिस उपआयुक्त, ७७ सहायक पोलिस आयुक्त यांच्यासह २४७५ पोलिस अधिकारी व २२,१०० पोलिस अंमलदार व ३ दंगल काबु पथक बंदोबस्तकामी तैनात करण्यात आलेले आहेत. राजधानी मुंबईतील ६ लोकसभा मतदारसंघात मतदान होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर तगडा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. त्यासाठी राज्याच्या विविध भागातून पोलिसांची आगाऊ कुमूक मागविण्यात आली आहे.

महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकांची सांगता २० मे रोजी होत असून मुंबईतसह १३ लोकसभा मतदारसंघात मतदान होत आहे. राज्यातील पहिल्या ४ टप्प्यात किरकोळ घटना वगळता मतदान सुरळीत आणि शांततेच पार पडले. त्यामध्ये, पोलिसांचा महत्त्वाचा वाटा आहे. तर, राज्यातील प्रचारसभांचाही शेवट आज झाला असून पंतप्रधान नरेंद्र मोदींसह दिग्गजांच्या सभा मुंबईसह महाराष्ट्रात पार पडल्या. या सभांसाठीही पोलिसांनी दिवस-रात्र मेहनत घेत चोख बंदोबस्त निभावून दाखवला. आता, शेवटच्या २० मे रोजीच्या मतदानसाठी मुंबई पोलिसांनी कंबर कसली आहे.

मुंबईसह उपनगरातील अतिरिक्त मदतीकरीता १७० पोलिस अधिकारी व ५३६० पोलिस अंमलदार व ६२०० होमगार्ड असे मनुष्यबळ तैनात करण्यात आले आहे. तसेच महत्वाच्या ठिकाणी ३६ केंद्रिय सुरक्षा दले यांची बंदोबस्तकामी नेमणूक करण्यात आलेली आहे. त्यामुळे, मुंबईत एकुण २७५२ पोलिस अधिकारी, २७४६० पोलिस अंमलदार, ६२०० होमगार्ड, ३ दंगल काबु पथक, ३६ केंद्रिय सुरक्षा दले निवडणुक बंदोबस्तकामी तैनात करण्यात आलेले आहेत.

लोकसभा निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने आचारसंहिता लागू झालेच्या म्हणजेच १६ मे पासून आजपर्यंत विविध कायद्याअंतर्गत मुक्त आणि निष्पक्ष निवडणुक पार पाडण्याकरीता एकुण ८०८८ प्रभावीपणे प्रतिबंधक कारवाई करण्यात आलेली आहे. लोकसभा निवडणूकीच्या अनुषंगाने फौ.दं.प्र.सं. कलम १४४ अन्वये १५ मे पासून मुंबई पोलिसांकडून आदेश प्रसारीत करण्यात आले असून मतदान केंद्रांच्या १०० मीटर परीघात (मतदान केंद्र परिसर)आणि मतदान केंद्राच्या आत मोबाईल फोन बाळगता येणार नाही.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR