मुंबई : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने आयपीएलच्या १८ व्या मोसमातील २० व्या सामन्यात मुंबई इंडियन्सविरुद्ध तोडफोड बॅटिंग केली आहे. आरसीबीच्या फलंदाजांनी मुंबईच्या गोलंदाजांची जोरदार धुलाई करत २२१ पार मजल मारली आहे. आरसीबीने मुंबईसमोर २२२ धावांचे आव्हान ठेवले आहे.
आरसीबीने २० ओव्हरमध्ये ५ विकेट्स गमावून २२१ धावा केल्या. आरसीबीसाठी विराट कोहली आणि कर्णधार रजत पाटीदार या दोघांनी सर्वाधिक धावांची खेळी केली. तसेच देवदत्त पडीक्कल याने चांगली साथ दिली. तर अखेरच्या क्षणी जितेश शर्मा याने नाबाद ४० धावांची खेळी केली. त्यामुळे आरसीबीला सहज २०० पार पोहचता आले. तर मुंबईसाठी कर्णधार हार्दिक पंड्या आणि ट्रेन्ट बोल्ट या दोघांनी प्रत्येकी २-२ विकेट्स मिळवल्या. तर विघ्नेश पुथुर याने १ विकेट मिळवली.