बीड : प्रतिनिधी
विधानसभा निवडणुकीची घोषणा होताच, पुन्हा एकदा बीडमधील राजकारण तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपकडून रणनिती आखली जात आहे. उमेदवाराच्या निवडीवर बैठका सुरु आहेत. सोमवारी रात्री पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांनी अजित पवार यांची भेट घेतली. रात्रीच्या दरम्यान मुंडे बहीण भावांनी भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाल्या आहेत.
बीड जिल्ह्यातील विविध उमेदवारीवरून भेट घेतल्याची सूत्रांनी सांगितले. डॉ. योगेश क्षीरसागर यांची बीड विधानसभा उमेदवारीसाठी लॉटरी लागू शकते, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. डॉ. योगेश क्षीरसागर यांनी लोकसभेला पंकजा मुंडेंचं केल होत ग्राउंड लेव्हलला काम केले होते.
त्यांना अजित पवारांकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. त्यासाठीच पंकजा मुंडे यांनी अजित पवारांची भेट घेतली. सोमवारी रात्री उशिरा भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी घेतली उपमुख्यमंत्री अजित पवार यांची देवेगिरी बंगल्यावर जाऊन भेट घेतली. या भेटीत दोन्ही नेत्यांमध्ये बीड जिल्ह्यातील विधानसभेच्या जागांवर चर्चा करण्यात आली आहे. या बैठकीला धनजय मुंडे देखील उपस्थित होते.