22.8 C
Latur
Wednesday, January 15, 2025
Homeछत्रपती संभाजीनगरमुंडे-कराड एकाच नाण्याच्या दोन बाजू

मुंडे-कराड एकाच नाण्याच्या दोन बाजू

वाल्मिक कराडला अटक झाल्यानंतर भाजप आमदार सुरेश धस यांची प्रतिक्रिया

बीड : बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात फरार असलेल्या वाल्मिक कराडला अखेर अटक करण्यात आली आहे. आज पुण्यात वाल्मिक कराड शरण आल्यानंतर त्याला अटक करण्यात आली. वाल्मिक कराड गेल्या तीन आठवड्यांपासून फरार होता. यानंतर त्याचा सगळीकडे शोध सुरु होता. यादरम्यान त्याने व्हीडीओ पोस्ट करत आपण शरण येत असल्याची माहिती दिली. दरम्यान या प्रकरणावरुन रान पेटवणा-या भाजपा आमदार सुरेश धस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत असा आरोप त्यांनी केला आहे.
चांगली गोष्ट झाली आहे. पळून पळून कुठपर्यंत पळणार? पोलिसांच्या तावडीतून सुटणे इतकी सोपी गोष्ट नसते. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी धडाधड निर्णय घेतली. सर्वात महत्त्वाचे म्हणजे संपत्ती जप्त करणे, खाती गोठवणं सुरु केल्याने त्याने शरण येण्याचा निर्णय घेतला असावा असे सुरेश धस म्हणाले आहेत. तपासावर समाधानी आहात का? असे विचारले असता ते म्हणाले इतरांनाही लवकरात लवकर अटक केली जावी. आकांनीच त्यांना मागे ठेवले असेल. त्यांचा सांभाळ तेच करत असतील.

हे प्रकरण टिकवण्यासाठी उज्ज्वल निकम यांच्यासारखा तगडा वकील दिला पाहिजे, फास्टट्रॅकवर केस चालवली पाहिजे, लवकर चार्जशीट दाखल करणे आणि अंडर ट्रायल चालणे महत्वाचे आहे अशा अपेक्षाही त्यांनी व्यक्त केल्या आहेत. धनंजय मुंडे यांच्या राजीनामाच्या मागणीसंदर्भात विचारले असता ते म्हणाले, मी कधीही त्यांच्या राजीनाम्याची मागणी केलेली नाही. ही मागणी त्यांच्याच पक्षाच्या आमदारांनी केली आहे. धनंजय मुंडे आणि वाल्मिक हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. शोले चित्रपटातील अमिताभ बच्चनचे नाणे ते आहेत असा आरोपही त्यांनी केला.

पालकमंत्रीपद मुख्यमंत्र्यांनी स्वीकारावं
आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्रीपद देवेंद्र फडणवीस यांनी घ्यावे ही माझी मागणी आजही आहे. त्यांनी पालकमंत्रीपद घेतल्याशिवाय हा बीड जिल्हा जिथे गँग्स ऑफ वासेपूर वाल्मिक आणि त्यांच्या कंपनीने निर्माण केले आहे ते सरळ होणार नाही. साहेब आल्यास हे सगळं होईल आणि विकासाचाही समतोल राखला जाईल, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे. धनंजय मुंडे मंत्रीपदी राहिल्यास काही गोष्टी मॅनेज करु शकतात. पण आम्ही मुख्यमंत्र्यांनी तसे होऊ देऊ नका सांगू असेही त्यांनी म्हटले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR