मुंडे-कराड व्यावसायिक भागिदार

मुंबई : वाल्मीक कराड हे धनंजय मुंडे यांचे केवळ समर्थक नाहीत तर त्यांचे व्यावसायिक संबंध आहेत. त्यामुळेच त्यांना राजाश्रय मिळत आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येसारख्या घटना भविष्यात महाराष्ट्रात होऊ द्यायचा नसतील तर धनंजय मुंडे यांना मंत्रिपदावरून तात्काळ दूर करावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन केली.

दमानिया यांनी आरोपांचे अनेक पुरावे अजित पवार यांना दिले आहेत. अजित पवार यांनी आपले म्हणणे ऐकून घेतले असून, उद्या दुपारी १२ वाजता ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर चर्चा करणार आहेत. यामुळे धनंजय मुंडे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे अटकेत असलेल्या वाल्मीक कराड यांच्याबरोबरील संबंधांमुळे राष्ट्रवादीचे मंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणीत वाढ होत चालली आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी हे प्रकरण अतिशय आक्रमकपणे लावून धरले आहे. आज त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन धनंजय मुंडे यांच्या विरुद्धचे ढीगभर पुरावे अजित पवार यांना दिले. अजित पवार यांच्या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना दमानिया यांनी याबाबतची माहिती दिली.

वाल्मीक कराड हे केवळ धनंजय मुंडे यांचे समर्थक नाहीत तर त्यांचे व्यावसायिक संबंध आहेत. धनंजय मुंडे,राजश्री मुंडे व वाल्मीक कराड यांच्या स्वाक्षऱ्या असलेले बॅलन्सशीट आपण अजित पवार यांना दिले आहेत. परळी औष्णिक ऊर्जा प्रकल्पातील फ्लाय अँश कंत्राटाची कागदपत्रे दिली आहेत. नियमानुसार मंत्रीपदावर असलेल्या व्यक्तीने लाभाचे पदावर असणे बेकायदा असून त्याचेही उल्लंघन झाले आहे. अजित पवार यांना बरेच फोटो, व्हिडिओ दाखवले. अनेक बाबींची त्यांनाही माहिती नव्हती. त्यांनी शांतपणे आपले सर्व म्हणणे ऐकून घेतले आहे.

उद्या ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन यासंदर्भात चर्चा करणार आहेत.धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळातून दूर करून या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी केली जाईल अशी अपेक्षा आहे. तसे न झाल्यास आपण न्यायालयाचे दरवाजे ठोठाववणार असल्याचे त्यांनी सांगितले. राजीनाम्याबाबत निर्णय न घेतल्यास मी सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांकडे सुमोटो दाखल करुन संबंधित आमदाराची आमदारकी रद्द करण्याची मागणी करणार असल्याचेही अंजली दामानिया यांनी सांगितले.

उद्या दुपारी १२ वाजता अजित पवार यांची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक आहे, मी जे पुरावे त्यांना दाखवले, कागदपत्रे दिली, त्या अनुषंगाने ते मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार आहेत. संतोष देशमुख यांच्यासोबत जे घडलं ते पुन्हा महाराष्ट्रात घडू नये, असे त्यांचेही म्हणणे आहे. त्यामुळे, मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केल्यानंतर ते धनजंय मुंडेंचा राजीनामा घेतील, असा विश्वास अंजली दमानिया यांनी व्यक्त केला.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|राहुल गांधींसह नेत्यांवरील कारवाई; शिरूर अनंतपाळमध्ये काँग्रेसचा निषेध
00:41
Video thumbnail
Nana Patekar passed away |नाट्य कलाकारांचा नटसम्राट हरवला;नाट्य क्षेत्रात शोककळा
07:57
Video thumbnail
Latur|वडवळ नागनाथमध्ये शेतकऱ्यांसमोर दुहेरी संकट; ना पीक, ना चारा-पाणी!
03:17
Video thumbnail
Latur|मध्यरात्री दारूच्या नशेत तरुणांचा बेधुंद राडा; एकाचं बोट तोडलं!
01:54
Video thumbnail
Bashir Shaikh|न्यायालयाच्या आवारातच बशीर शेखला मारहाण; सामाजिक कार्यकर्त्यांचा संताप
02:27
Video thumbnail
Latur|बशीर शेखसह गंभीर गुन्हेगारांचं वकीलपत्र घेऊ नका; लातूर जिल्हा वकील मंडळाचं आवाहन
06:34
Video thumbnail
Latur|फरार बशीर शेखला अखेर बेड्या; बार्शीतून लातूर पोलिसांनी घेतलं ताब्यात
03:24
Video thumbnail
Nana Patekar Speech|अभिनेते नाना पाटेकर आपल्या भाषणात भावूक का झाले? काय म्हणाले
24:31
Video thumbnail
Nana Patekar|ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं निधन; वयाच्या ७५व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
01:31
Video thumbnail
Nanded|निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्यासह SIRविरोधात इंडिया आघाडीचा नांदेडमध्ये मोर्चा
03:34
Video thumbnail
लातूरच्या कन्हेरी चौकातून अपहरण करत बर्दापूर येथील खडी केंद्रावर मारहाण; ३२वर्षीय तरुणाचा मृत्यू
02:56
Video thumbnail
Nanded|डॉक्टर होण्याचं स्वप्न, हातात विळा! MBBS विद्यार्थी आईसोबत सोयाबीन काढतोय
03:40
Video thumbnail
Nanded|नांदेडमध्ये पाणी चोरीविरोधात धडक कारवाई; ५ दिवसांत ४०० मोटारींची कनेक्शन कट
02:36
Video thumbnail
Latur|आदर्शवर बुलडोझर फिरणार? फरार बशीर शेखच्या अडचणी वाढल्या!
03:39
Video thumbnail
Latur|ठाकरे चौकातील कोयता हल्ल्यानंतर पोलिस ॲक्शन मोडवर; शहरात सरप्राईज नाकेबंदी
03:41

Latest news